सेंद्रीय शेतीसाठी बैलगाडी मिरवणुक

जनजागृतीसाठी बालगोपालांच्या हाती फलक
सेंद्रीय शेतीसाठी बैलगाडी मिरवणुक

कसबे सुकेणे । वार्ताहर Sukene-Niphad

मौजे सुकेणे (Sukene) येथे प्रथमच सेंद्रिय व विषमुक्त शेतीसाठी (Organic and non-toxic agriculture) जनजागृतीसाठी गावातील बालगोपालांनी एकत्र येत विषमुक्त शेतीसंदर्भातील (Toxin free farming) फलक हाती घेत सजवलेल्या बैलगाडीसह मिरवणूक काढली.

शेती व विषमुक्त शेती प्रयोग परिवारातर्फे ही मिरवणूक काढण्यात आली. सद्यस्थितीत सर्वच पिकांवर रासायनिक खते (Chemical fertilizers) व कीटकनाशकांचा (Pesticides) अतिरिक्त वापर होत असल्याने नागरिकांचे आरोग्य (health) धोक्यात येत आहे.

त्या दृष्टिकोनातून मौजे सुकेणेसह पंचक्रोशीतील शेतकर्‍यांचे (Farmers) लक्ष वेधण्यासाठी व विषमुक्त शेतीचे फायदे लोकांना पटवून देण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत बालगोपालांसह गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही मिरवणुकीत भाग घेत विषमुक्त शेती काळाची गरज असल्याचे पटवून देण्यात आले.

तर बैलजोडींची शेती आणि शेतकर्‍यांचे महत्व यावर फलकातून जनजागृती केली. मिरवणुकीचा शुभारंभ आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) जितेंद्र भावे (Jitendra Bhave), माजी जि.प. सदस्य राजेंद्र मोगल, महंत सुकेणेकर बाबा यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अरुण मोगल, सर्जेराव मोगल, प्रताप मोगल, प्रकाश मोगल, शाम मोगल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com