पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृती

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या ( Nashik Cyclists Association ) क्रीडाप्रेमींनी नाशिकरोडच्या प्रभाग क्रमांक 20 येथील परिसरामध्ये सायकल रॅली काढून पर्यावरणपूरक गणेशोत्सव (eco friendly Ganesh festival )साजरा करण्याची हाक नागरिकांना दिली.

.दत्तमंदिर चौकातून या रॅलीला प्रारंभ झाला. गणेशभक्तांनी पर्यावरण रक्षण, संवर्धनासाठी शाडूमातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी. घरच्याघरी बादलीतच विसर्जन करावे. निर्माल्य व इतर कोणताही कचरा नदीपात्रात टाकून जलप्रदूषण करू नये असे प्रबोधन यावेळी सायकलस्वार महिला पुरुषांनी केले.

त्यांना नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रॅलीमध्ये अध्यक्ष राजेश वानखेडे यांच्यासह 30 जणांचा सहभाग होता. त्यात 8 महिलांनीही हजेरी लावली.

नाशिक सायकलिस्ट आसोसिएशनने नाशिकमधून भारताला बरेच आयर्नमॅन दिलेले आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे असे मनोगत फ्लॅश अँड ब्रिक असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील मेंढेकर यांनी प्रभाग क्रमांक 20 चे प्रतिनिधी म्हणून व्यक्त केले. नाशिक सायकलिस्ट असोसिएशन निरामय नाशिक बरोबरच हरित नाशिक ची संकल्पना राबवते.

नागरिकांच्या आरोग्याबरोबर पर्यावरणाची देखील योग्य सांगड घालून नाशिक शहरात प्रचार आणि प्रसाराचे अभूतपूर्व काम करत आहे, हे अवर्णनीय आहे. त्यांचा आम्हाला नेहमी अभिमान वाटतो असे मनोगत महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे यांनी व्यक्त केले. प्रभाग क्रमांक 20 मधील ज्येष्ठ नागरिक संघाने ह्या पर्यावरण पूरक गणेशोत्सव उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

आपण राबवत असलेल्या संकल्पनेचा सर्वजण मनापासून विचार करतील, जास्तीत जास्त गणपती बाप्पा विसर्जन बादलीत करून पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कटिबद्ध राहतील असा संकल्प नागरिकांनी व्यक्त केला.

नाशिक सायकलीस्ट असोसिएशन देखील प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांचा उत्साह बघून खूष झाले. त्यांनी मुले व युवकांना सायकल चालवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिखरे मैदान, बिटको चौक,शिवाजी पुतळा या परिसरात रॅलीद्वारे प्रबोधन केल्यावर देवळाली गावातील गांधी पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला.

सोमवारी तपोवन, मेट्रो मॉल परिसरातही रॅली काढण्यात आली. आज(दि.9) दिंडोरी रोडवरील चांभारलेणे येथे सकाळी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.अशी माहिती मनोज गायधनी व सहकार्‍यांनी दिली

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com