ई-पिक पाहणीसाठी गावोगावी जाऊन प्रचार

ई-पिक पाहणीसाठी गावोगावी जाऊन प्रचार

सिन्नर। वार्ताहर Sinnar

महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) ई-पिक पाहणी प्रकल्पाच्या (E-Crop Survey Project) प्रचार व प्रसिद्धीचे कार्य तालुक्यातील कृषि विभागाने (Department of Agriculture) सुरु केले आहे. तालुका कृषि अधिकारी आण्णासाहेब गागरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावांत जात कृषी सहाय्यक प्रचार करत आहेत.प्रकल्पाच्या कार्यास कृषि विभागाच्या महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेचा (Maharashtra State Agricultural Assistants Association) विरोध होता.

कृषि मंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या आदेशानुसार संघटनेने आपला विरोध मागे घेत सदर प्रकल्पाच्या प्रचार प्रसिद्धीस अनुमती दिली आहे. याच पार्श्वभुमिवर तालुक्यातील आटकवडे, आडवाडी, आशापुर, उजनी, एकलहरे, औंढेवाडी, कासारवाडी, कृष्णनगर, केदारपूर, खडांगळी, गुरेवाडी, गुळवंच, जामगांव, ठाणगांव,

दत्तनगर, दुसंगवाडी, देशवंडी, दोडी खु, धुळवड, धोंडविरनगर, निर्‍हाळे, फर्दापूर, बोरखिंड, ब्राम्हणवाडे, भाटवाडी, भोकणी, मर्‍हळ खु, मर्‍हळ बु, मोह, वारेगांव, श्रीरामपूर, सरदवाडी, सावता माळीनगर, हिवरे या गावांमध्ये प्रचाराचे काम सुरु झाले आहे. ई-पिक पाहणीच्या (E-Pick Survey) माध्यमातून शेतकर्‍यांना आपल्या शेतातील पिकांची नोंद ही स्वत: करायची आहे.

ई-पीक पाहणीद्वारे शेतकर्‍यांनी (Farmer) केलेल्या नोंदणीमुळे कारभारात पारदर्शकता येणार आहे. शिवाय यंत्रणेत कोणी मध्यस्थी नसल्याने थेट लाभ हा शेतकर्‍यांना होणार आहे. ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंदणी या उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष आहे. हा ऐतिहासक निर्णय असून प्रशासनाशी थेट जोडणी असल्याने पीक पेर्‍याची आकडेवारी, भविष्यातील उत्पादन आणि बाजारभाव याबद्दल शेतकर्‍यांना माहिती होणार आहे.

ई-पीक पाहणीचे असे आहेत फायदे

ई-पीक पाहणी अ‍ॅपमुळे शेतकर्‍यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकर्‍याचे नुकसान होणार आहे ना सरकारची फसवणूक. या अ‍ॅपवरील नोंदीमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. यावरुन भविष्यात बी-बियाणे, लागणारी खतेही उपलब्ध करुन देता येणार आहेत. एका मोबाईलवरुन 50 शेतकर्‍यांच्या नोंदी करता येणार असल्याने प्रत्येक शेतकर्‍याकडे मोबाईल नसला तरी फारसा फरक पडणार नाही.

प्रबोधनाचे सुक्ष्म नियोजन तालुक्यातील 33 गावामध्ये कृषि विभागाचे कृषि सहाय्यक विविध माध्यमांच्या सहकार्याने ई-पिक पाहणीबाबत जनजागृती करून प्रचार प्रसिद्धी आणि शेतकर्‍यांचे प्रबोधन करणार आहेत. सदर गावांच्या प्रचार प्रसिद्धी, प्रबोधनाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. ई-पिक पाहणी अ‍ॅपमध्ये खरीप पिकाच्या नोंदणीची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर असून सर्व शेतकरी बांधवानी तलाठी, कोतवाल, कृषि सहाय्यक यांच्या सहकार्याने पिकाची नोंद करून घेणे आवश्यक आहे.

- आण्णासाहेब गागरे, तालुका कृषि अधिकारी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com