साथरोग नियंत्रणासाठी जनजागृती

मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपक्रम
साथरोग नियंत्रणासाठी जनजागृती

जानोरी । वार्ताहर Janori

सध्या साथीच्या रोगांचा (communicable disease ) प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांना त्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्र (Mohadi Primary Health Center ) नेहमीच अग्रेसर असते. त्याच पार्श्वभूमीवर आपल्या क्षेत्रात कुठेही साथीच्या आजारांना आमंत्रण मिळू नये, यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. एस. लोणे यांच्या मार्गदर्शनाखाली साथ रोग सर्वे करून गावात जनतेला आरोग्य शिक्षण देण्याचे आदर्श काम मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चालू आहे.

यावेळी आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा कार्यकर्ती हे नागरिकांशी संवाद साधताना दिसत आहे. यावेळी डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यात आपली अंडी देतो. यामुळे आपले घर व घरातील परीसरात पाणी साचू न देण्याबाबत मार्गदर्शन केले जाते.

घरातील पाण्याची टाकी झाकून ठेवावे, घरातील फुलदाणी, कुलर, फ्रिज यात पाणी साचू देवू नये, आठवड्यातून एकदा घासून पुसून स्वच्छ करणे व उन्हात वाळवणे. आपल्या घराभोवती पाणी साचू देवू नये. साचत असेल तो खड्डा माती टाकून बुजवून टाकणे किंवा पाणी वाहते करणे, नाहीतर खराब ऑईल टाकणे, याचबरोबर घरातील खिडक्यांना जाळी बसवणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे,

आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, घरातील वापरायचे पाणी वापरुन झालेवर पाणी झाकून ठेवावे किंवा घट्ट कपडा बांधून ठेवणे, घरातील संडासच्या पाईप यांना वरती जाळी बांधून ठेवणे, घरावर किंवा घराजवळ टायर, नारळाच्या करवंट्या ठेवू नये, असे मार्गदर्शन करून घरात कुणालाही ताप आल्यास जवळच्या सरकारी दवाखान्यात जावे, असा सल्लाही देण्यात येतो. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संध्याकाळी गावात धुरफवारणी करण्यात येईल, तेव्हा घरातील खाण्याचे अन्नधान्य झाकून ठेवावे व घरात धुरफवारनी करून घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

यावेळी गावात सर्वे करून जनजागृती करण्यात आली. डास अळी असलेल्या पाण्यात अ‍ॅबेट टाकले. काही पाण्याची भांडी रिकाम्या करायला लावले. खड्ड्यांमध्ये ऑईल टाकण्यात आले. अशा विविध कार्यक्रम राबवून मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात साथीच्या रोगांवर कसे नियंत्रण मिळवता येईल, याचे पुरेपूर नियोजन मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे केले असल्याने परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com