पोषक आहाराबाबत जनजागृती व मार्गदर्शन

पोषक आहाराबाबत जनजागृती व मार्गदर्शन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या महिला-बालकल्याण समितीतर्फे (Zilla Parishad Women and Child Welfare Committee )सभापती आर्कि. अश्विनी अनिल आहेर यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी दुर्गम भागात जाऊन पोषण महिन्या निमित्त (occasion of Nutrition Month )महिलांना मार्गदर्शन केले जात आहे.

दि. 1 सप्टेंबर 2021 पासून नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महिना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती आर्कि. अश्विनी अनिल आहेर यांच्या नेतृत्वात समिती सदस्या रेखा पवार, कविता धाकराव, गितांजली पवार-गोळे, गणेश अहिरे तसेच उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) दीपक चाटे व सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी बार्‍हे (ता. सुरगाणा) या अतिदुर्गम भागात समक्ष जाऊन स्थानिक महिलांना प्रकल्पातील सर्व अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पोषण महिन्यामध्ये कोणकोणते उपक्रम कार्यक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी सभापती आर्कि. अश्विनी आहेर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, सुरगाणा या आदिवासी तालुक्यात ‘माझे मूल, माझी जबाबदारी’च्या अनुषंगाने कोविडसदृश्य लक्षणे असलेल्या मुलांची तपासणी आणि उपचार करणे असे विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित करावे. स्थानिक पातळीवर गर्भवती मातांचे मेळावे घेऊन पोषक आहाराबाबत जनजागृती करावी. आदिवासी भागातील मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे. बालविवाह करण्यापासून परावृत्त करावे. सुरगाणा तालुका कुपोषणमुक्त करावा, असे आवाहन केले.

बार्‍हे प्रकल्पाचे बालविकास अधिकारी अर्जुन झरेकर यांनी सांगितले की, दुर्गम भागात येऊन मार्गदर्शन करण्यासाठी महिला व बालकल्याण समिती व अधिकारी यांनी प्रथमच दुर्गम अशा प्रकल्पात येवुन प्रोत्साहन दिले व मार्गदर्शन केल्यामुळे येथील ग्रामस्थ, महिला व आम्ही भारावून गेलो.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी सांगितले की, महिला व बालविकास विभाग हा पुण्याचे काम करीत आहे. प्रत्येक अंगणवाडी सेविका-मदतनीस या नोकरी नव्हे तर सेवा म्हणून कार्य करीत असल्याने कामाचे समाधान मिळते. याप्रसंगी सुरगाणा पंचायती समितीच्या माजी सभापती मंदाकिनी भोये, बार्‍हे येथील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com