नायलॉन मांजाविरोधात जनजागृती

नायलॉन मांजाविरोधात जनजागृती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात( Pataleshwar Secondary School) नायलॉन मांजाविरोधी ( Nylon Manja) मोहीमउघडून जनजागृती करण्यात येत आहे. पतंग उडवतांना नायलॉन मांजा वापरणार नाही व वापरून देणार नाही, अशी शपथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली.

नायलॉन मांजामुळे पर्यावरणातील पशु-पक्षी, लहान मुले व माणसे यांना इजा होऊन मोठया प्रमाणात दुर्घटना होण्याची शक्यता असते. म्हणून नायलॉन मांजावर बंदी टाकण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी आज घेतला. गावात व परिसरात विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजाविरोधात मोहीम उघडली आहे.

बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांच्या मार्गदर्शनातून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोहिमेला पालकांसह परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावात नायलॉन मांजा उपलब्ध होणार नाही याची खबरदारीही विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतली आहे.

संस्थेचे अध्यक्ष राहुल सोनवणे, उपाध्यक्ष प्रा. टी. एस. ढोली, सहसचिव अरुण गरगटे, कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी. के. रेवगडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी. थोरे उपस्थित होते.

आम्ही शपथ घेतो की...

विद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेली शपथ: आम्ही सर्व विद्यार्थी अशी शपथ घेतो की, पतंग उडवण्यासाठी आजपासून आम्ही नायलॉन मांजा वापरणार नाही आणि अशाप्रकारे नायलॉन मांजा कोणी वापरत असेल तर त्यांना त्यापासून परावृत्त करू. माणसांना व पक्षांना वेदना देणार्‍या नायलॉन मांजाविरोधात जनजागृती करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. वाहनाची वर्दळ असलेल्या ठिकाणी पतंग उडवणार नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com