आरासाच्या माध्यमातून लसीकरणाबाबत जनजागृती

आरासाच्या माध्यमातून लसीकरणाबाबत जनजागृती

देवळाली कॅम्प । प्रतिनिधी Devlali Camp

नाशिक तालुक्यातील Nashik Taluka शिंदे येथील पांगारकर कुटुंबीय Pangarkar Family दरवर्षी घरगुती गणेशोत्सवात Ganesh Festivalपर्यावरणपूरक व सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी सजावट Decoration करतात.

यावेळच्या सजावटीमध्ये गणपती उंदरास लस Vaccine देत असल्याचे देखावा सादर केला असून त्याद्वारे लसीकरणाचे महत्व पटवून द्यायचा प्रयत्न केला आहे. महेंद्र पांगारकर Mahendra Pangarkar यांनी गणपतीची मूर्ती स्वतः बनवली असून त्यासाठी शाडूच्या मातीचा वापर केला आहे.

सजावटसुद्धा पर्यावरणपूरक केलेली आहे. त्यासाठी त्यांनी प्लास्टिक, थर्मोकोलचा वापर टाळला असून सजावटीसाठी रद्दी वर्तमानपत्र व टिशू पेपरचा वापर केलेला आहे. सामाजिक बांधिलकी जपणारी ही पर्यावरणपूरक सजावट परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

Related Stories

No stories found.