खेड्यापाड्यात लसीकरणाबाबत जनजागृती करायला हवी..!

आमदार खोसकर यांचे आवाहन
खेड्यापाड्यात लसीकरणाबाबत जनजागृती करायला हवी..!

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही वाढला असतांना कोरोना लसीबाबत ग्रामीण भागात गैरसमज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक याबाबत जनजागृती व्हायला हवी असा निर्णय हरसुल येथील बैठकीत घेण्यात आला आहे.

इगतपुरी त्र्यंबकेश्वर आमदार हिरामण खोसकर यांनी गुरुवारी हरसूलमध्ये कोरोना बाबत आढावा बैठक घेतली. बैठकीत खेड्यापाड्यात लस घेण्यासाठी नागरिक सहज तयार होतील या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

ही लस खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे टाळाटाळ करू नका, असे आवाहन आमदार खोसकर यांनी जनतेला दिले आहे. हरसूल येथे (कोविड १९) विलगीकरण कक्षाबाबत ही बैठक पार पडली. पाच ऑक्सिजन काँसेटर हरसूल ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षका डॉ उज्वला तेजाळे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.

परिसरातील सुशिक्षिताना प्रशासकीय यंत्रणा यांना मदत करण्यासाठी सूचना करणेत आली. हरसुल परिसरात कोविड १९ या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी गावातील लोकांना जनजागृती करुन लसीकरण करणेसाठी उद्युक्त करुन भागांतील कोरोना महामारी संपविणे साठी एकत्रित येऊन काम करण्याची गरज असल्याचे भावनिक आवाहन करण्यात आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com