ग्रामसभांमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जनजागृती

ग्रामसभांमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जनजागृती
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधून Grampanchayats 26 जानेवारी रोजी होणार्‍या ग्रामसभेत स्वच्छ भारत मिशन Swachha Bharat Mission (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत कोव्हीड निर्देशाच्या पालनासह स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. याबाबत सर्व गटविकास अधिका-यांना निर्देश देण्यात आले असून सांडपाणी व घनकच-याची कामे पूर्ण करुन गाव हागणदारीमुक्त अधिक करण्याच्याही सुचना देण्यात आलेल्या आहेत.

राज्यात केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा - 2 राबवण्यात येत आहे. लोकसहभाग हा स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 चा गाभा आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 बाबत लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण होऊन या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे. देशातील सर्व ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) संपूर्ण देशामध्ये 2 ऑक्टोबर 2014 राबवणे सुरु केले आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 18 एप्रिल 2018 रोजी संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र राज्य योग्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने वैयक्तीक व पायाभूत सर्वेक्षणानुसार हागणदारीमुक्त सार्वजनिक स्तरावर शोष खड्ढे तसेच झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.

स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 मध्ये प्रामुख्याने सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासह गाव हागणदारीमुक्त अधिक करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पात्र कुटुंबांची वैयक्तीक शौचालय बांधकामाची नियोजित कामे पूर्ण करणे, सार्वजनिक शौचालयांची कामे पूर्ण करणे, 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून मर्यादीत स्वरूपात नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करणे आदि कामे करण्यात येत आहेत. सदरची कामे लोकसहभागातून विहित वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी 26 जानेवारी रोजीच्या ग्रामसभेत याबाबत माहिती देण्याचे निेर्दश शासनाने दिले असून त्याप्रमाणे ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com