विवाहात मंगलाष्टक ऐवजी झळकले करोना जनजागृतीचे फलक

विवाहात मंगलाष्टक ऐवजी झळकले करोना जनजागृतीचे फलक

येवला । Yeola

येवल्यात तेजस लाड व पूनम कुलकर्णी यांचा शुभविवाह शासकीय नियमाचे पालन करत संपन्न झाला.

हा शुभविवाह संपन्न होत असताना नेहमी जे मंगलाष्टक लग्नकार्यात म्हटले जाते.

ते न म्हणता करोनावर जनजागृती पर असे मंगलाष्टक गुरुजींनी म्हणुन हा शुभ विवाह संपन्न झाला. तसेच मंडपात करोना जनजागृतीचे विविध असे संदेश फलक या दोन्ही परिवाराच्या वतीने लावण्यात आले होते.

त्यात करोनाला हरवूया देशाला वाचवूया, झाली जरी सर्दी प्रकर्षाने टाळा गर्दी, ठेवूया एक मीटर अंतर करोना होऊदे छूमंतर, हात जोडून नमस्कार हाच खरा शिष्टाचार, मास्क नाही तर प्रवेश नाही, करोनाला घाबरू नका अफवांवर विश्वास ठेवू नका, नियम पाळा करोना टाळा, विनाकारण प्रवास करण टाळा असे विविध करोना जनजागृती फलक लग्न मंडपात लावून शुभविवाह हा करोना जनजागृती पर मंगलअष्टक म्हणत पार पडला.

तसेच लग्नात आलेल्या पाहुण्यांचे थर्मल स्कॅनर व ऑक्सिमिटरच्या सहायाने तपासणी करत शासनाने घालून दिलेल्या अटीनुसार हा विवाह संपन्न झाला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com