मोडाळे, दरी ग्रामपंचायतींंना पुरस्कार जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार सन्मान
मोडाळे, दरी ग्रामपंचायतींंना पुरस्कार जाहीर

नाशिक । प्रतिनिधी Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील ( Igatpuri Taluka ) अत्यंत दुर्गम असलेल्या मोडाळे गावाला ( Modale Village ) आदर्श पुरस्कार जाहीर झाला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi )यांच्या हस्ते या गावाचा सन्मान होणार असून जिल्ह्यातील पहिले गाव तथा पहिलीच ग्रामपंचायत ( Modale Grampanchayat ) म्हणून नावलौकिक होणार आहे.नाशिक तालुक्यातील दरी गावाचीही ( Dari Village )यासाठी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान,गेल्या दहा वर्षांपूर्वी हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावे लागणारे गाव तालुक्याच्या नकाशात देखील दिसत नव्हते मात्र आज या गावाचा पूर्णपणे कायापालट झाला आहे. अत्याधुनिक सुख सोयी, मुबलक पाणी पुरवठा, स्वातंत्र्य ग्रामपंचायत कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका, ग्रीन जिम, लग्न समारंभ तसेच इतर कार्यक्रमासाठी सुसज्ज हॉल, पूर्ण गावात काँँक्रिटिकरण रस्ते, पथदीप, सौरऊर्जेवर विद्युत पुरवठा अशा सर्वच सुख सुविधा या गावात उपलब्द आहे. या सर्व कामांची दखल घेत केंद्र सरकारच्यावतीने भारत सरकारकडून नाशिक जिल्हाधिकारी मोडाळे ग्रामपंचायतला पंडित दीनदयाल उपाध्य पंचायत सशक्तीकरण पुरस्कार (Pandit Deendayal Upadhyay Panchayat Empowerment Award )जाहीर झाला आहे.

विशेष म्हणजे देशातील तथा महाराष्ट्रातील शेकडो ग्रामपंचायतीनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये राज्यातील फक्त चौदा ग्रामपंचायतींची या पुरस्कारासाठी निवड झाली असुन त्यामध्ये जिल्ह्यातील व इगतपुरी तालुक्यातील पाहिले एकमेव मोडाळे ग्रामपंचायतचा समावेश आहे.

दि २४ रोजी हा पुरस्कार दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिला जाणार आहे. गावाच्या विविध विकासकामांच्या माध्यमातून या ग्रामपंचायतची निवड झाली आहे. ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने व जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या माध्यमातून या गावाचा कायापालट झाला आहे.कोट्यवधी रुपयांचे विकासकामे करून त्यांनी हे गाव राज्याच्या नकाशावर आणल्यामुळे ग्रामस्थानी देखील त्यांचे आभार मानले आहे.

मोडाळे ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थांच्या पदाधिकारी यांच्या एकीमुळे मोठ्या प्रमाणात विकास कामे करता आली त्यामुळे मोडाळे ग्रामपंचायत या पुरस्कारासाठी सक्षम ठरली असून भविष्यात गाव अजून मॉडेल करता येईल, यासाठी परिश्रम घेईल.

- गोरख बोडके, जिल्हा नियोजन समिती सदस्य.

Related Stories

No stories found.