जि.प. शाळेच्या शिक्षिका ज्योती आहिरे यांना पुरस्कार

जि.प. शाळेच्या शिक्षिका ज्योती आहिरे यांना पुरस्कार

दिंडोरी/कळवण | प्रतिनिधी Dindori

राष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणार्‍या दिंडोरी तालुक्यातील भातोडे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका ज्योती आहिरे यांना राष्ट्रीय नवोपक्रम पुरस्कार मिळाला आहे.महाराष्ट राज्यातून एकमेव असा पुरस्कार मिळाला असल्यामुळे जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांचे वतीने देशात शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणार्‍या घटकासाठी राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन 18 जुलै नेहरू भवन येथे करण्यात आले होते. आयोजन केले.या स्पर्धेसाठी एकूण 60 नवोपक्रमाची नोंद झाली.एन सि ई आर टी च्या वतीने प्रत्यक्ष जाऊन नवोपक्रमाची पडताळणी करण्यात आली.त्या सर्व उपक्रमातून अंतिम फेरीसाठी 26 नवोपक्रमाची निवड करण्यात आली.

स्पर्धेचे परिक्षण डॉ.शरद सिन्हा , बी पी भारद्वाज, सिन्हा, प्रा. सुजाता श्रीवास्तव , डॉ. विजयन यांनी केले.त्यात आहिरे यांच्या उपक्रमाची निवड झाली. आहिरे यांनीआदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या गणित संबोध सुलभ होण्यासाठी अ‍ॅबकस चा वापर हा नावीन्यपूर्णउपक्रम ,ग्रामीण आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये गणितीय बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी अबॅकस या प्राचीन तंत्राचा वापर सादरीकरण केले.

गणित हा विषय कठीण असल्याने तो लहानपणापासून सोपा जावा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, यासाठी हा विषय अबॅकसच्या साह्याने वेगळ्या पध्दतीने शिकवता येता.अबॅकसच्या अभ्यास पद्धतीमुळे मुलांच्या दैनंदिन अभ्यासामध्ये मोठा बदल जाणवतो. विद्यार्थी अतिशय हुशारीने आकडेमोड करतात. त्यामुळे मेंदूविकास होण्यास नैसर्गिकपणे मदत होते.या नवोपक्रमासाठी त्यांनी आपल्या वर्गातील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना अबॅकस या विषयाचे अध्यापन केले. हा विषय आपल्या ग्रामीण आदिवासी परिसरात संपूर्णतः नवीन आहे. यासाठी शिक्षकांनी स्वतः अबॅकस शिकून आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्याचे अध्यापन केले. या नवोपक्रमाच्या पडताळणीसाठी एन सी आर टी दिल्ली येथील सदस्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भातोडे येथे भेट दिली.

भातोडे शाळेच्या ज्योती आहिरे यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त झाल्याने इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी असून तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे.

चंद्रकांत गवळी,गटशिक्षणाधिकारी

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com