केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना पुरस्कार प्रदान

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना पुरस्कार प्रदान

जानोरी | वार्ताहर Janori

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन कड़ून नवनियुक्त केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार या केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री पदाच्या माध्यमातून करोनामुक्ती साठी करत असलेल्या कार्याचा वर्ल्ड बुक ऑफ रेकोर्ड, लंडन (World Book of Records, London) कड़ून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

वर्ल्ड बुक ऑफ रेकोर्ड चे ( World Book of Records ) यूरोप चे अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाख़ाली जगभरात ७० देशामध्ये करोनामुक्ती साठी जनजागृती केली जात आहें. तसेच करोना मुक्ती साठी कार्य करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी Certificate of Commitment (Switzerland) ने व्यक्ती व संस्था ना सम्मानित करण्यात येत आहें

या उपक्रमा अंतर्गत वर्ल्ड बुक ऑफ रेकोर्ड चे राष्ट्रीय सचिव डॉक्टर दीपक हरके ( Dr. Deepak Harke, National Secretary, World Book of Records )यांनी नवनियुक्त केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना नासिक मर्चेंट इंडस्ट्रीयल बँके च्या सभाग्रहामध्ये Certificate of Commitment (Switzerland) ने सम्मानित केले. या वेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविदयालयाच्या नासिक च्या उप क्षेत्रीय प्रशासिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी, ब्रह्माकुमारी पूनमदीदी उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com