नॅब महाराष्ट्रतर्फे गुणवंतांना पुरस्कार

विविध पुरस्कारांचे उद्या वितरण
नॅब महाराष्ट्रतर्फे गुणवंतांना पुरस्कार

सातपूर । प्रतिनिधी Satpur

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, महाराष्ट्रच्या (National Association for the Blind, Maharashtra ) वतीने दरवर्षी दिल्या जाणार्‍या विविध पुरस्कारांचे वितरण सोमवारी (दि.28) सकाळी 10.30 वाजता नॅब संकुल, सातपूर ( NAB Sankul, Satpur ) येथे आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी नॅब महाराष्ट्रचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री हे राहणार असल्याची माहिती पुरस्कार समितीचे चेअरमन मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, नॅब महाराष्ट्र संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, उपाध्यक्ष सुर्यभान साळुंखे यांनी पत्रकार परिषदेला दिली. यंदाचा आदर्श संस्थेचा पुरस्कार चिपळूनच्या अंधशाळेला देण्यात आला आहे.

नॅब महाराष्ट्रतर्फे देण्यात येणार्‍या या पुरस्कारांचे हे 24 वे वर्षे असून, आतापर्यंत 23 कुलगुरु या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. या पुरस्कारासाठी राज्यातील इ.10 वी, इ.12 वी व बोर्डातील प्रथम श्रेणीतील विद्यार्थी, विद्यापीठाद्वारे अंतिम पदवी प्राप्त विद्यार्थी, अंधशाळेत किंवा अंधांना शिकविणारे अंध वा डोळस विशेष शिक्षक, महाविद्यालयातील प्राध्यापक, दृष्टीबाधितांसाठी कार्य करणारी संस्था, विशेष काम करणारा दृष्टीबाधित व्यक्ती अशा राज्यभरातील सुमारे 85 जणांना पुरस्कार देवून गौरविले जाणार आहे. या पुरस्कारांचे वितरण दरवर्षी राज्यातील विविध विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या हस्ते करण्यांत येते.

या पुरस्कार निवड करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये प्रामुख्याने प्राचार्य डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज, प्राचार्य डॉ. भास्कर गिरीधारी, के. के. वाघ इंजिनिअरींग इन्स्टिट्यूूटचे डीन डॉ. सुनील कुटे, प्रा. डॉ. सिंधू काकडे, प्रा.विजयकुमार पाईकराव व समिती सचिव म्हणून संपत जोंधळे यांनी काम पाहिलेे.

एमपीएससी, युपीएससी परीक्षा देऊ इच्छिणार्‍या अंध बांधवांसाठी वसतीगृह उभारण्याचा मानस असून राज्यपालांच्या 20 लाखांच्या विशेष निधीतून येत्या दोन वर्षांत हे वसतिगृह आकार घेणार असल्याचे नॅब महाराष्ट्रचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी सागितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com