बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांना पुरस्कार

बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांना पुरस्कार

लासलगाव। प्रतिनिधी Lasalgaon

येथील बाजार समितीने Lasalgaon APMC शेतकरी हित जोपासत शासनाच्या विविध योजना यशस्वी राबवून करोना काळात व्यापारी व कामगार वर्गाशी समन्वय साधून शेतीमाल विक्री व्यवस्थेचे योग्य नियोजन Proper planning of agricultural sales system करून शेतकरी बांधवांना माल विक्रीची सोय करण्याबरोबरच गेल्या 75 वर्षांपासून अमावस्येला लिलाव बंदची प्रथा मोडीत काढून जास्तीत जास्त दिवस लिलावाचे कामकाज सुरू ठेवले.

सदर कामाबद्दल बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांना त्यांच्या आदर्शवत व प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन त्यांना नवराष्ट्र को ऑपरेटिव्ह अवार्डस् 2021 Navrashtra Co-operative Awards 2021 सलग्न 'बेस्ट फिमेल चेअरमन ऑफ मार्केट कमिटी' ‘Best Female Chairman of the Market Committee या राज्यस्तरीय पुरस्काराने यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे गौरविण्यात आले.

एक स्त्री असूनही सक्षम नेतृत्वात कृषि उत्त्पन्न बाजार समितीस नावलौकिक प्राप्त करून देणार्‍या महिला सभापति सुवर्णा जगताप Market Committee Women Chairperson Suvarna Jagtap यांनी राज्याचे दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, राज्यसभा सदस्य खा. संजय राऊत व नवभारत ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर निमिष माहेश्वरी यांच्या हस्ते सदर पुरस्कार स्विकारला.

यावेळी बाजार समितीचे सदस्य रमेश पालवे, सचिव नरेंद्र वाढवणे, सहसचिव प्रकाश कुमावत, रंजना शिंदे उपस्थित होते. सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी सर्व सहकारी सदस्य, शेतकरी, अडते, व्यापारी, माथाडी-मापारी कामगार, मदतनीस व बाजार समितीचे अधिकारी, सेवक तसेच नवभारत ग्रुपच्या संयोजकांचे आभार व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com