
नाशिक । प्रतिनिधी Nashik
पंचवटी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा सध्या सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.सीताराम कोल्हे यांना 'पंचवटी रत्न पुरस्कार' जाहीर करण्यात आले आहे.
महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयतर्फे दरवर्षी पंचवटी परिसरातील असामान्य कार्यकर्तृत्वाचा पंचवटी रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. डॉ. कोल्हे यांच्या कार्याची दखल घेत शैक्षणिक वर्ष 2021-22 चा पंचवटी रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार, दि. 27 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती लोकनेते व्यंकटराव कला, विज्ञान व वाणिज्यचे प्राचार्य डॉ. बापू सोनू जगदाळे यांनी दिली.