...असे गीत गावे तुझे हित व्हावे; 'अशी' रंगली काव्यमैफिल

सिन्नर। प्रतिनिधी | Sinnar

माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे.. अशा एकाहून एक सरस कवितांनी (Poet) मंत्रमुग्ध करत नगर परिषदेच्या (nagar parishad) लोकशाहिर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात (Lokshahir Annabhau Sathe Natyagriha) निमंत्रित कवींनी महाकवी वामनदादा कर्डक (great poet Vamandada Kardak) यांच्या विचारांचा जागर केला.

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सिन्नर (Maharashtra Sahitya Parishad, Sinnar Branch) व पु. ल. कट्टा, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्य गृहात कविसंमेलन व ‘हे गीत वामनाचे’ या शाहिरी जलशाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील देशवंडी गावचे भूमिपुत्र व महाराष्ट्राचे शाहीर लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त निमंत्रितांच्या कविसंमेलनाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मराठी साहित्य परिषद शाखेचे अध्यक्ष प्रा. राजाराम मुंगसे (Marathi Sahitya Parishad branch president Prof. Rajaram Mungse) यांच्या अध्यक्षस्थानी होते. प्रसिध्द कवी आणि ‘उंच माझा झोका’ या मालिकेच्या शीर्षक गीताचे गीतकार अरुण म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कवी म्हात्रे यांनी आपल्या भावोत्कट कवितांनी प्रेक्षकांची मने जिंकली. मसापचे कार्याध्यक्ष कवी रवींद्र कांगणे, कोषाध्यक्ष प्रा. मंगल सांगळे यांच्यासह प्रा. जावेद शेख, सोमनाथ एखंडे, युनूस शेख, रोहिणी मिठे, अमोल चिने, बाबासाहेब भोरकडे, सुनीता सानप, योगेश थोरात, काजल शेलार, उत्तम खताळे, जयश्री चव्हाणके, नागेश सोंडकर आणि मलेका शेख यांनी कविसंमेलनात भाग घेतला. पु. ल. कट्टाचे कवी रमेश आव्हाड यांचा या संमेलनात विशेष सहभाग होता. मनीषा उगले यांच्या बहारदार सूत्रसंचलनाने कार्यक्रमात रंगत आणली.

आभार सूर्यभान धाकराव यांनी मानले. दुसर्‍या दिवशी रविवारी (दि. 15) ‘हे गीत वामनाचे’ या शाहिरी गीतांच्या कार्यक्रमात ‘वादळवारा’ फेम गायक मिलिंद मोरे, ‘भीमराज की बेटी’ फेम शकुंतला जाधव व कलासंचाने वामनदादा कर्डक यांची गीते सादर करुन वातावरण स्फूर्तिमय केले. यावेळी डॉ. योगीराज बागुल यांचे ‘कविता व गाण्यापलीकडील वामनदादा’ या विषयावर व्याख्यान झाले. प्रास्ताविकातून कवी कांगणे यांनी म.सा.प. सिन्नर शाखेच्या साहित्यिक उपक्रमाची माहिती देताना महिनाभरात होऊ घातलेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनासाठी मदतीचे आवाहन केले.

प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सीमंतिनी कोकाटे (Former Zilla Parishad member Seemantini Kokate) उपस्थित होत्या. कोविड काळात उल्लेखनीय सामाजिक योगदान दिलेल्या कोविड योद्ध्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, बंटी भागवत, किशोर खराटे, रवींद्र कर्डक, अर्जुन डोमाडे, डॉ. विष्णु अत्रे, डॉ. निर्मला पवार, गायक ऋषीकेश शेलार, हर्षद देशमुख उपस्थित होते. सूत्रसंचलन जावेद शेख यांनी केले. आभार प्रा. सचिन उगले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितेश दातिर, शाहीर स्वप्नील डुंबरे, बाबासाहेब भोरकडे, उत्तम खताळे, प्रियांका केदार यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com