गोवर अहवालाची प्रतीक्षा; आरोग्य विभागचे परिस्थितीवर लक्ष

गोवर अहवालाची प्रतीक्षा; आरोग्य विभागचे परिस्थितीवर लक्ष
देशदूत न्यूज अपडेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिका (Nashik Municipality) हद्दीत मागील काही दिवसांमध्ये एकूण 48 नमुने गोवर (Measles) संशयित रुग्णांचे (patient) घेण्यात आले होते. त्यातील तीस अहवाल निगेटिव्ह (negative) आले असून 18 अहवाल अप्राप्त आहे.

तपासणीसाठी नाशिक महापालिकेने नमुने मुंबईला (mumbai) पाठवले असून मुंबईहून अहवाल आल्यावर गरज पडली तर त्याला अहमदाबादला (Ahmedabad) देखील पाठवावे लागणार आहे, दरम्यान नाशिक शहरात (nashik city) गोवर साथ नियंत्रणात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने (Municipal administration) केला आहे.

मुंबईसह जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात गोवरचे आजार वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर मनपाचे आरोग्य विभाग (Department of Health) परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मनपाच्या बिटको रुग्णालय (Bitco Hospital), डॉ. जाकीर हुसैन रुग्णालय (Dr. Zakir Hussain Hospital) येथे कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नागरिकांनी काळ्जी घ्यावी. तसेच शहरात 32 लसीकरण (vaccination) सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com