करोना केंद्राला शासकीय मान्यतेची प्रतीक्षा

करोना केंद्राला शासकीय मान्यतेची प्रतीक्षा

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

करोनाची तिसरी लाट Corona Third Wave राज्यासह देशांतर्गत सुरू झाली असून झपाट्याने करोना विषाणू संक्रमित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आरोग्य विभागासह सरकारची डोकेदुखी वाढली असताना सर्व सुविधांयुक्त असलेले लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात Lasalgaon Rural Hospital सुरू असलेल्या कोविड सेंटरला Covid Center - Lasalgaon आरोग्य विभागाकडून Department of Health अद्यापही approval मान्यता न मिळाल्याने उपचारासाठी रुग्णांची हेळसांड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या पावणे दोन वर्षापूर्वी करोनाचा प्रादूर्भाव सुरू झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील पहिला रुग्ण हा लासलगाव येथे आढळून आला होता. त्यावेळी निफाड तालुक्यासाठी लासलगाव येथे ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटरला मान्यता देण्यात आली होती. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी रुग्णांवर योग्य उपचार करत काळजी घेतल्याने मृत्युदर ही कमी ठेवण्यात यश आले होते.

मात्र, आता करोनाची तिसरी लाट सुरू झालेली असतांना निफाड तालुक्यात ओमिक्रोनचा अद्यापिही शिरकाव झालेला नसला तरीही 120 जणांना करोनाची बाधा झाली असून पिंपळगाव बसवंत येथील शासकीय तर खासगी रुग्णालयात काही रुग्ण उपचार घेत आहेत. काही रुग्णांचे अहवाल जरी पॉझिटिव्ह आले असले मात्र कुठल्याही प्रकारचा त्रास नसल्याने घरी उपचार घेत आहेत. लासलगाव ग्रामीण रुग्णालयात असलेल्या कोविड सेंटरला अजूनही जरी मान्यता नसेल पण वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने 45 बेड तयार केले आहे.

यात 40 बेड मोठ्या रुग्णांसाठी तर 5 बेड लहान मुलांसाठी असणार असून या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट ही कार्यान्वित केला आहे. रुग्ण संख्येत वाढ झाल्यास वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात येईल अशी माहिती लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सतीश सूर्यवंशी Medical Superintendent of Lasalgaon Rural Hospital Dr. Satish Suryavanshi यांनी दिली आहे. मात्र असे असले तरी लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनीही या रुग्णालयाकडे लक्ष देवून व शासनदरबारी पाठपुरावा करून कोविड सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com