लसीकरणासाठी गर्दी टाळावी - जिल्हाधिकारी मांढरे

१२ ते १६ आठवड्यांनी कोव्हिशिल्ड देण्याच्या सुचना
लसीकरणासाठी गर्दी टाळावी - जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक । प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस देण्याचा कालावधी हा ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे असा केलेला आहे. त्यामुळे शनिवारपासून (१५ ) ज्यांनी कोविशिल्ड चा पहिला डोस घेवून ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत, त्यांनाच दुसरा डोस दिला जाईल.

उर्वरीत ज्यांचा विहित १२ ते १६ आठवड्यांचा कालावधी पूर्ण झाला नसेल त्यांना दुसरा डोस दिला जाणार नाही. त्यामुळे कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुसऱ्या लसीसाठी घाई करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय लसीकरण मोहिमेचे घटना व्यवस्थापक गणेश मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनूसार नाशिक जिल्ह्यात कोवीड १९ प्रतीबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. कोवीड-१९ प्रतीबंधात्मक लसीकरणाबाबत नवीन संशोधनास अनुसरुन केंद्र सरकार व राज्य शासनाच्या नव्याने प्राप्त सुचनांनुसार यापुर्वी ज्या लाभार्थ्यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतलेला आहे, अशा लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोसचे अंतर ६-८ आठवड्यांवरून १२-१६ आठवडे इतके ठरवण्यात आलेले आहे. म्हणजेच ८४ दिवसांनंतर दुसरा डोस देय राहील.

तर कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसच्या यापूर्वीच्या प्रोटोकॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस पूर्वीप्रमाणेच ४-६ आठवड्याने देण्यात येईल. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांच्या कोविशिल्ड लसीच्या पहिला डोसला ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यात येईल व ४५ वर्ष व त्यावरील वयोगटापुढील उर्वरीत लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात येईल याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी व पात्र लाभार्थ्यांनीच लसीकरण केंद्रावर जावे .

१८-४४ वयोगटातील लाभार्थ्यांचे राज्य शासनाच्या प्राप्त सुचनांनुसार सध्या लसीकरण थांबवण्यात आलेले असुन पुढील सुचना प्राप्त झाल्यावरच त्यांचे लसीकरण सुरु करण्यात येईल. त्यामुळे नागरीकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. या संदर्भात कोविन पोर्टलवर सुद्धा ही माहिती अपडेट करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी न करता लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.

- पहिला डोस घेवून ८४ दिवस झालेल्यांनाच मिळणार कोविशिल्ड चा दुसरा डोस

- कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार ४ ते ६ आठवड्यांनी

- ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांसाठी पहिल्या डोस साठी लसीकरण सुरू राहील

- १८ ते ४४ वयोगटासाठींच्या नागरिकांचे लसीकरण शासनाचे पुढील आदेश मिळपर्यंत स्थगित

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com