वरूणा नदी संवर्धनसाठी अविरल कलश सुपूर्द

वरूणा नदी संवर्धनसाठी अविरल कलश सुपूर्द

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

तीर्थक्षेत्र नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar), गंगाद्वार (Gangadwar) येथून 'चला जाणुया नदीला' या उपक्रम अंतर्गत अमृत महोत्सव नदी यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे.

नंदिनी, वालदेवी, कपिला, वरुणा, मोती, अगस्ती, माळुंगी या नद्यांवर काम करणार्‍या गोदासेवकांच्या तसेच वरुणा नदी (Varuna River) (वाघाडी) यांच्या टीमला कलश सुपूर्द करण्यात आला.

याप्रसंगी पंचवटी (panchavati) - म्हसरूळ (Mhasrul) वरूणा नदी संवर्धन समितीच्यावतीने (Varuna River Conservation Committee) सुनिल परदेशी, प्रकाश उखाडे, राहुल जोरे, विरेंद्रसिंग टिळे, सुभाष कापडी, अब्बासभाई हुसेनी आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन अभिनेते किरण भालेराव यांनी केले. तसेच संध्याकाळी गोदावरी नदीच्या (godavari river) प्रवित्र रामकुंडावर (ramkund) संध्याकाळी सर्व गोदाप्रेमीच्या हस्ते आरती करण्यात आली.

वरुणा नदी संवर्धन समितीच्या सोबत सहभागी संस्था यूथ राष्ट्रीय युवा शक्ती, पोलीस मित्र परिवार संघ, मैत्रजीवाचे फाऊंडेशन, आम्ही सेवेकरी ग्रूप, नावनाथपंढी सामाजिक संस्था, जय शिवशंकर मित्र मंडळाचे पदाधिकारी व गोदाप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com