मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ऑटो रिक्षा सौंदर्य स्पर्धा

उमाकांत प्रभाळे यांची रिक्षा प्रथम
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ऑटो रिक्षा सौंदर्य स्पर्धा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे (Eknathji Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी बाळासाहेबांची शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या वतीने ऑटो रिक्षा सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या ऑटो रिक्षा सौंदर्य स्पर्धेत पंचवटीतील उमाकांत प्रभाळे यांच्या रिक्षाने प्रथम क्रमांकाचे रोख 21 हजार रुपयांचे पारितोषिक पटकाविले आहे.

मुख्यमंत्री (CM) शिंदे यांच्या दिवसानिमित्त हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात आयोजित रिक्षा सौंदर्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण नाशिकचे (Nashik) पालकमंत्री दादा भुसे (Dada bhuse) यांच्या प्रमुख उपस्थितीत, पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महिला आघाडी जिल्हा संघटक लक्ष्मीताई ताठे, महिला आघाडी महानगरप्रमुख अश्विनी देशमाने, युवसेना महानगरप्रमुख दिगंबर नाडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

या रिक्षा सौंदर्य स्पर्धेत नाशिक, पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे या जिल्ह्यातून 338 रिक्षा सहभागी झाल्या होत्या. नाशिक विभागातून प्रथम बक्षिस रोख 21,000 रुपये पंचवटीतील उमाकांत प्रभाळे यांच्या रिक्षा क्रमांक एमएच 15 एफयू 5060, द्वितीय बक्षिस रोख 11,000 रुपये प्रमोद कडजेकर यांच्या रिक्षा क्रमांक एमएच 15 9459, तृतीय बक्षिस 7,000 रुपये सागर चौधरी, चतुर्थ बक्षिस 5,000 रुपये श्रीपाद जाधव आणि पाचवे बक्षिस 2,000 रुपये रोख सागर क्षत्रिय यांच्या रिक्षाला मिळाले. उत्तेजनार्थ पारितोषिक (prize) गोकुळ तांबडे, अनिल अष्टेकर, सुनील जोशी, चंद्रकांत पाटील, वसीम शेख, अजित गांगुर्डे यांच्या रिक्षांना देण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com