‘कर्जमुक्ती’साठी आधार प्रमाणिकरण करा

‘कर्जमुक्ती’साठी आधार प्रमाणिकरण करा

जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शासनाच्या महात्मा जोतीराव फुले (Mahatma Jotirao Phule) शेतकरी कर्जमुक्ती योजनेत (Farmers Debt Relief Scheme) ज्या शेतकर्‍यांची नावे योजनेच्या आधार प्रमाणिकरणाच्या यादीत आहे. मात्र अद्याप ज्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले नाही. त्या शेतकर्‍यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सतीश खरे (District Deputy Registrar Co-operative Society Satish Khare) यांनी केले आहे.

शासनाच्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत योजना अंमलबजावणीचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. ही योजना नजिकच्या काळात पुर्णत्वास न्यावयाची आहे. त्यानुसार ज्या शेतकर्‍यांची नावे योजनेच्या आधार प्रमाणिकरणाच्या यादीत आहे. मात्र,अद्याप ज्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले नाही. अशा शेतकर्‍यांसाठी आधार प्रमाणीकरणासाठी दि.15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहिम राबवण्यात येत आहे.

नाशिक जिल्हयात (nashik district) 1104 शेतकर्‍यांचे आधार प्रमाणिकरण अद्याप बाकी आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक (District Central Bank), राष्ट्रीयकृत खासगी बँका, तालुका उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे आधार प्रमाणिकरण बाकी असलेल्या शेतकर्‍यांची यादी उपलब्ध आहे. अशा शेतकर्‍यांनी त्यांचे बँक पासबुक व आधार कार्ड घेऊन संबंधित बँकेत किंवा नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे.

बँकेचे नोडल अधिकारी व तालुका उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाने देखील या शेतकर्‍यांशी त्यांच्या यंत्रणेमार्फत संपर्क करुन त्यांचे आधार प्रमाणिकरण करुन घेण्याची कार्यवाही करावी, असे आवहन खरे यांनी केले आहे.

अंतिम संधी

आधार प्रमाणिकरणाची ही अंतिम संधी आहे. आधार प्रमाणिकरणासाठी दि.15 नोव्हेंबर 2021 हा अंतिम दिनांक राहील. आधार प्रमाणिकरण न झाल्यास योजने अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळु शकणार नाही,याची नोंद घ्यावी. तसेच मयत कर्जदाराच्या बाबतीत अदयावत माहिती पोर्टलवर सादर करण्यासाठी दि.22 ऑक्टोबर ते दि.8 नोव्हेंबर 2021 या कालावधीत बँकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याची मयत कर्जखातेदाराचे वारस व बँका यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सतीश खरे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com