काँग्रेस कमिटीच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिन साजरा
नाशिक

काँग्रेस कमिटीच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिन साजरा

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्यावतीने ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला ,तसेच आदिवासी दिन (दि.९) निमित्ताने आदिवासी समाजाला जागृत करणारे राष्ट्र पुरुष बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर यांनी मनोगत व्यक्त केले.

भारताच्या चळवळीच्या इतिहासाची थोडक्यात माहिती दिली .मुबई येथील आझाद क्रांती मैदान येथे इंग्रजांच्या अन्याय व अत्याचारा विरुद्ध चले-जाव चळवळीस सुरवात करण्यात आली व तशी घोषणा देण्यात आली.भारताच्या स्वातंत्राच्या इतिहासात ९ ऑगस्ट या दिनास असाधारण महत्व असल्याने सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा दिवस आहे.असे सांगितले.

यावेळी सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांच्या सूत्रसंचालनाखाली झेंडा वंदन करण्यात आले.यावेळी प्रदेश सचिव डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील,नगरसेविका व महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वत्सला खैरे, नगरसेविका आशा तडवी,

मागासवर्गीय प्रदेश सचिव सुरेश मारू ,सेवादल अध्यक्ष वसंत ठाकूर ,माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, ज्ञानेश्वर काळे,मध्य-नाशिक ब्लॉक अध्यक्ष निलेश खैरे,अण्णा मोरे,मुन्ना ठाकूर,लक्ष्मण धोत्रे,दर्शन पाटील ,ज्ञानेश्वर चव्हाण ,नंदू येवलेकर, राजेंद्र महाले,हानिफ बशीर ,प्रमोद धोंगडे, सूरज चव्हाण, भगवान आहेर,कैलास महाले,कैलास कडलग,सूरज कांबळे आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com