‘सूर विश्वास’ मैफिलीत रसिक मंत्र मुग्ध

‘सूर विश्वास’ मैफिलीत रसिक मंत्र मुग्ध

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शास्त्रीय संगीतातील प्रयोगशील जाणिवांनी समृध्द गायनाची अनुभूती रसिकांना पं. अविराज तायडे ( Pandit Aviraj Tayde )यांच्या अभिजात स्वरांनी दिली आणि संगीताच्या एका वैशिष्ट्यपूर्ण मैफिलीने रसिकांना तृप्त केले. सुरातून ईश्वरभक्तीचा अनोखा संगम अनुभवण्यास मिळाला.

नव्या पिढीतील कलाकारांच्या आविष्काराला व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ ( Sur Vishvas )या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. मैफिलीचे हे चौदावे पुष्प पं.अविराज तायडे यांनी गुंफले. विश्वास ग्रुपचे प्रमुख विश्वास ठाकूर व ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे.

यावेळी नितीन वारे (तबला), दिगंबर सोनवणे (पखवाज), भक्ती बोरसे (संवादिनी) अमित भालेराव (तालवाद्य) आशिष रानडे (गायन) संस्कार जानोरकर (तानपुरा), आर्या गायकवाड (तानपुरा) यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन डॉ.स्मिता मालपुरे यांनी केले. सदर कार्यक्रम विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन व ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक लीना बनसोड उपस्थित होत्या. यावेळी मिलिंद हिरवे, किशोर कदम, शुभांगी तायडे, दत्तात्रय कोठावदे, राजा पाटेकर आदी मान्यवरांचा सन्मान विश्वास ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ.मनोज शिंपी, विनायक रानडे, अ‍ॅड.नंदकिशोर भुतडा, कविता गायधनी, डॉ.श्रीश क्षीरसागर, स्वाती पाचपांडे, डॉ. प्राचार्य प्रशांत पाटील, डॉ.हेमंत ओस्तवाल, रमेश पडवळ यांच्या हस्ते करण्यात आला.

Related Stories

No stories found.