सिन्नरला पाच हजार जाळी टोमॅटोंची आवक

सिन्नरला पाच हजार जाळी टोमॅटोंची आवक

सिन्नर | वार्ताहर | Sinnar

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडांगळी उपबाजार आवारात टोमॅटो (Tomatoes) खरेदी विक्रीचा शुभारंभ आ. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला....

पहिल्याच दिवशी सुमारे पाच हजार जाळी आवक झाली. सभापती लक्ष्मण शेळके (Laxman Shelke) अध्यक्षस्थानी होते.शेतकर्‍यांच्या मागणीला प्रतिसाद देत बाजार समितीने लिलाव सुरु करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

शेतकर्‍यांना यापूर्वी दुरवर आपला टोमॅटो शेतमाल विक्रीसाठी न्यावा लागत असे. आता परिसरातील शेतकर्‍यांची सोय झाल्यामुळे त्यांचा वेळ, श्रम, वाहतुक खर्चदेखील वाचणार असल्याचे प्रतिपादन आ. कोकाटे यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सिमंतीनी कोकाटे, उपसभापती संजय खैरनार, सरपंच योगेश घोटेकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुदेश खुळे, माजी सभापती कचरु डावखर, माजी उपसभापती काशिनाथ सानप, पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते विजय गडाख, सदस्य रविंद्र पगार, संचालक शांताराम कोकाटे, सुधाकर शिंदे उपस्थित होते.

सूत्रसंचालन माजी उपसभापती सोमनाथ भिसे यांनी केले. शेतकर्‍यांनी आपले नुकसान टाळण्यासाठी बांधावर विक्री न करता वडांगळी उपबाजार आवारात विक्रीसाठी आणावा असे आवाहन शेळके यांनी केले. टोमॅटो खरेदीत प्रभाकर हारक, अनिल हारक, ज्ञानेश्वर मुरडनर, दत्तु गडगे, प्रमोद यादव, बापु डांगे, अण्णा हारक, निवृत्ती चव्हाणके यांनी पुढाकार घेतला.

सात दिवस लिलाव

यापुढे दर सोमवार ते रविवार असे सलग सात दिवस टोमॅटो शेतमालाचा लिलाव सुरु असणार आहे. शेतकरी बांधवांना आपल्या टोमॅटो शेतमालाचे लिलाव झाल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरुपात पेमेंट अदा केले जात आहे.

पहिल्याच दिवशी वडांगळी पंचक्रोशीतील शेतकर्‍यांचा लिलावास चांगला प्रतिसाद लाभाला असून 5000 क्रेटसची आवक झाली असल्याची माहिती सचीव विजय विखे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com