लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे लिलाव ११ जुलै पर्यंत बंद
नाशिक

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे लिलाव ११ जुलै पर्यंत बंद

लासलगाव व परिसरात करोना रुग्णांची संख्या वाढल्याने निर्णय

Abhay Puntambekar

लासलगाव । प्रतिनिधी

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा आणि धान्य लिलाव ११ जुलैपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती सभापती सुवर्णा जगताप,उपसभापती प्रीती बोरगुडे व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली आहे.

लासलगाव व परिसरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या महिन्याच्या २७ तारखेला ५३ वर्षे महिला करोनाबाधित सापडल्याने त्यानंतर १८ जणांना करोनाची बाधा झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर सदर निर्णय घेण्यात आला आहे.

यापैकी करोनामुक्त झालेल्या १० जणांची घरवापसी झाल्याची माहिती लासलगाव कोविड सेंटरचे डॉ.राजाराम शैंद्रे यांनी दिली. आशिया खंडातील कांद्याची प्रसिद्ध असलेली बाजारपेठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात विषाणूचा शिरकाव झाल्याने कांदा व्यापार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

कांदा व्यापार्‍याला करोनाची बाधा झाली आहे.त्यामुळे लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे लिलाव शनिवारपर्यंत बंद राहणार आहे. त्याबरोबर धान्य, भाजीपाला लिलाव बंद असल्याने लासलगाव बाजार समितीतील कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com