जिल्हा बँकेकडून कर्ज वसुलीसाठी जमिनींचे लिलाव

जिल्हा बँकेकडून कर्ज वसुलीसाठी जमिनींचे लिलाव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (NDCC Bank) आर्थिक संकटातून बाहेर काढण्याकरीता थकबाकी वसुलीसाठी (Arrears recovery) कठोर पावले उचलण्यात आले आहेत. त्यानुसार विविध कार्यकारी संस्थाच्या मोठे थकबाकीदार व प्रभावशाली थकबाकीदार यांच्यावर सहकार कायदा नियम १०७ अन्वये स्थावर मिळकत, जमीन (Land) जप्ती करून लिलावाच्या (Auction) प्रक्रिया करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत...

सटाणा तालुक्यातील (Satana Taluka) सन २०१३ पूर्वीचे हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांवर कर्ज वसुली प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांची स्थावर मिळकत, जमीन जप्त करून अपसेट प्राईज मंजुरीसाठी तालुक्याचे सहाय्यक निबंधक यांच्याकडे प्रकरण मंजुरीसाठी पाठविण्यात आलेले होते.

त्यांनी मंजुरी दिल्यांनतर थकबाकीदार सभासदास ७ दिवसाची कर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत नोटीस देण्यात आली होती. तसेच दि.१ एप्रिल २०२२ व दि. ५ एप्रिल २०२२ रोजी जाहीर नोटीस प्रसिध्द करूनही थकबाकीदार सभासदानी थकबाकी कर्जाची रक्कम न भरल्यामुळे सटाणा तालुक्यातील २७ थकबाकीदार सभासदाची स्थावर मिळकत, जमीन लिलावाची प्रक्रिया दि.४ मे २०२२ रोजी बँकेचे विभागीय कार्यालय सटाणा येथे करण्यात येणार आहे.

जिह्यातील सर्व थकबाकीदार सभासदांनी कटू कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा करून बँकेच्या सामोपचार योजनेमध्ये थकबाकीदारांसाठी भरघोस सवलत देऊ केलेली असल्याने जास्तीत जास्त थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीचा भरणा करून बँकेस सहकार्य करावे व लिलावाची कटुता टाळावी, असे आवाहन बँकेचे प्रशासक कदम व मुख्य कार्यकारी अधिकारी पिंगळे यांनी बँकेच्यावतीने केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com