अधिकृत प्रभाग रचना जाहीर होण्याकडे लक्ष

अधिकृत प्रभाग रचना जाहीर होण्याकडे लक्ष

नाशिक | फारुक पठाण Nashik

निवडणूक आयोगाच्या Election Commission सुचनेनुसार नाशिक मनपा प्रशासनाने NMC Administraion आगामी मनपा निवडणुकीच्या Upcoming NMC Election दृष्टीने 133 वॉर्डच्या एकूण 44 प्रभागाचा कच्चा आराखडा Raw layout of the ward structure तयार करून गुप्त पध्दतीने आयोगाला सादर केला आहे.

तरी शहरात कशा पध्दतीने नवीन वॉर्डची कटिंग झाली आहे, याबाबत चर्चांना ऊत आहे. यामुळे काही इच्छुक नाराज दिसत आहे, तर काही खुश दिसत आहे. मात्र अंतिम प्रभागरचना अधिकृतपणे जाहीर झाल्यावरच नेमकी कटिंग कशी झाली आहे. हे स्पष्ट होणार आहे.

नव्या प्रभागाच्या सीमांसह प्रभाग क्रमांक देखील सध्या चर्चेत आले आहे. यानुसार अनेक इच्छुकांनी तयारीला देखील प्रारंभ केल्याचे दिसत आहे. चर्चेत असलेल्या कटिंगमुळे काही दिग्गच नगरसेवकांना फटकादेखील बसतांना दिसत आहे. मात्र अधिककृत घोषणा झाल्यावरच खरे दित्र स्पष्ट होणार आहेे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर शहरात गुप्त बैठकांचा जोरदेखील वाढला आहे.

करोना रुग्णसंख्येत सतत वाढ होत असल्याने फेब्रुवारीत होणारी निवडणूक पुढे जाण्याची शक्यता असली तरी विविध राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवार, नेते तसेच कार्यकर्त्यांमध्ये जोश वाढत असल्याचे दिसत आहे. 2017 साली राज्यात भाजपची सत्ता होती. त्यावेळी चार सदस्यी प्रभागरचना तयार करण्यात आली होती. त्याचा मोठा फायदादेखील भाजपा झाला होता. त्यावेळी तब्बल 66 नगरसेवक भाजपचे निवडून आले होते, तर मनपात पहिल्यांदा भाजपची एकहाती सत्ता आली होती.

मात्र यंदा राज्यात सत्ताबदल झाले असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची महाविकास आघाडीची सत्ता आहे. यामुळे यंदा चार सदस्यी प्रभाग पध्दत रद्द करुन 3 सदस्यी प्रभाग रचना करण्यात आली आहे. याला मनसेनेने जोरदार विरोध केला आहे, तर यंदा 122 वरुन 133 नगरसेवक संख्या निवडून महापालिकेत जाणार आहे. आगामी महापालिका निवडणूक त्रिसदस्यी प्रभाग पध्दतीने होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

यानुसार नाशिक महापालिका प्रशासनाने निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेप्रमाणे 43 प्रभाग 3 सदस्यी व एक 4 सदस्यी प्रभागाची रचना करुन आयोगाला पाठविले आहे. शहरातील काही वॉर्ड कटिंग करुन नव्याने वॉर्ड तयार करण्यात आले आहे. क्षेत्र कमी असला तरी मतदान संख्या 33 हजारांच्या जवळपास राहणार आहे. प्रशासनाने आपल्या स्तरावर तयारी सुरू केली असली तरी करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने निवडणूक वेळेवर होणे शक्य दिसत नाही.

राज्यातील औरंगाबाद, नवीन मुंबई या ठिकाणी तर मागील कित्येक महिन्यांपासून प्रशासक राजवट सुरू आहे. निवडणूक वेळ निघून गेल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 18 महापलिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. यामध्ये नाशिक मनपाचा देखील समावेश आहे.

विकासकामांच्या उद्घाटनांचे नियोजन

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी काळात विविध विकासकामांच्या उदघाटनाचे नियोजन होत आहे. यामध्ये नमामी गोदा, लॉजेस्टीक पार्क, आयटी हब तसेच मनपाच्या विविध भूखंडांचे बीओटीवर विकासकामांचा शुभारभ आदींचा समावेश असल्याचे समजते. महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्‍यांनी केंद्र सरकाराकडून निधी आणला आहे. त्याचप्रमाणे विशेष महासभा घेऊन मनपात मानधनावर नोकर भरती प्रस्ताव मंजूर करण्याचा श्रेय देखील भाजप घेत आहे. त्याचप्रमाणे मुंबईप्रमाणे नाशिक मनपा हद्दीतील 500 चौ. फुटापर्यंत मिळकत धारकांना कर माफीचा विषयदेखील महापौर कुलकर्णी यांनी उपस्थित करून मनपा आयुक्तांना पुढील महासभेत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

बैठकांचा जोर वाढला

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरणत तापत आहे. तर गुप्त बैठकांचा जोर वाढला आहे. 2022 मध्ये मनपा निवडणूक होत असली तरी राजकीय पक्ष व नेत्यांची नजर 2024 मध्ये होणार्‍या विधानसभा व लोकसभा निवडणुकीकडे लागली आहे. ज्या पक्षांचे नगरसेवक जास्त निवडून येणार त्या पक्षाला पुढील निवडणुका सोपे जाणार आहे, यामुळे कोणीही मनपा निवडणूक सोपी असल्याचे न सांगत अत्यंत बारकाईने नियोजन करीत आहे.

शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी नाशिकमध्ये मनपा निवडणुकीसाठी विशेष कोर कमिटी तयार केले आहे. यामध्ये नवे व जुने नेत्यांचा समतोल ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीची टिम कामाला लागली आहे. मनपात सत्ताधारी असलेल्या भाजपने देखील विशेष नियोजन केल्याचे समजते. काँगे्रस, मनसेना आदी पक्षांचे पदाधिकारी व नेते सध्या मनपा निवडणुकीच्याच कामात गुंतल्याचे दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com