नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

नवीन नाशकात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या होल्डिंगवर काही गुन्हेगारांचे फोटो असल्याच्या कारणावरून आज ( दि. ८) अंबड पोलीस ठाणे येथे एका भाजप नगरसेवकासह राजकीय नेत्यांची हजेरी लागली.

यामध्ये सत्ताधारी असलेल्या असलेल्या पक्षासह विरोधी पक्षाचे झेरॉक्स नगरसेवकही उपस्थित झाल्याने नेमका विषय काय आहे याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

नवीन नाशिक परिसरात शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या होल्डिंग्स चे मोठ्या प्रमाणावर अस्तित्व निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांकडून होल्डिंगवर लागलेल्या फोटोच्या लोकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात आली यामध्ये अनेक लोकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या मार्गदर्शनानुसार उपायुक्त विजय खरात यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार अंबड पोलिसांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेले सर्व होल्डिंगची तपासणी करून यावर असलेल्या संशयितांचे फोटोची देखील तपासणी केली.

यावरून भाजपा तसेच शिवसेनेचे झेरॉक्स नगरसेवक यांनी अंबड पोलिस ठाण्यामध्ये हजेरी लावली हा विषय आज दिवसभर नवीन नाशिक मध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.