यूपीएससी परीक्षेला ७१ टक्के विद्यार्थ्यांची हजेरी

कडेकोट बंदोबस्त : शहरातील दहा केंद्रांवर झाली परीक्षा
यूपीएससी परीक्षेला ७१ टक्के विद्यार्थ्यांची हजेरी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) UPSC Exam रविवारी ( दि. १०) नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२१ घेण्यात आली. यावेळी नाशिक शहरात पहिल्यांदाच या परीक्षेसाठी केंद्र देण्यात आले होते. शहरातील दहा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.यावेळी दोन सत्रात परीक्षा घेण्यात आली.

परीक्षेसाठी ३ हजार ४४५ विद्यार्थ्या पैकी पहिल्या सत्रात २ हजार ४७४ विद्यार्थी तर दुसऱ्या सत्रात २ हजार ४५७ विद्यार्थी उपस्थित राहिले. तर ९७१ विद्यार्थीनी पहिल्या तर ९८८ विद्यार्थ्यानी दुसऱ्या सत्रात परीक्षेकडे पाठ फिरवली.

नाशकात Nashik प्रथमच होत असलेल्या परिक्षेसाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी समन्वयक पर्यवेक्षक म्हणून तर आयुक्तांची राज्य निरीक्षक म्हणून तर एकूण ४८० अधिकारी कर्मचाऱ्यांची उपकेंद्र प्रमुख स्थानिक पर्यवेक्षक, समवेक्षक व इतर मदतनीस म्हणून काम पाहिले.

परीक्षा नाशिक शहरातील मराठा हायस्कूल जुनी व नवीन इमारती, बिटको हायस्कूल, केव्हीएन नाईक महाविद्यालय, रचना विद्यालय, एचपीटी महाविद्यालय आदी दहा केंद्रांवर घेण्यात आली. दहा दिव्यांग उमेदवारांसाठी स्वतंत्र परीक्षा केंद्र देण्यात आले होते. यावेळी सर्व केंद्रावर आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Related Stories

No stories found.