नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

राज्य शासनाच्या आदेशानुसार आजपासुन नववी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू झाले आहे. यानुसार नाशिक महापालिका क्षेत्रात माध्यमिक विभागांतर्गत असलेल्या 2 हजार 318 विद्यार्थ्यांपैकी 384 विद्यार्थ्यांनी वर्गात हजेरी लावली.

शहरात 13 शाळांतील 11 मुख्याध्यापक व 65 शिक्षकांनी उपस्थित लावली. दरम्यान पहिल्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडला नसुन काही माध्यमिक शाळांत नववी व दहावी असे वर्ग दिवसाआड सुरू केले आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात माध्यमिकच्या नववी व दहावी वर्ग भरण्यासंदर्भातील नियोजन मनपा शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुनिता धनगर यांच्याकडे देण्यात आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरात वर्ग भरविण्यासंदर्भात तयारी पूर्ण होऊन नववी व दहावीचे वर्ग सुरू झाले.

शहरातील 13 शाळांत 9 वीचे 1219 आणि 10 वीचे 1039 अशाप्रकारे विद्यार्थी संख्या असल्याने यादृष्टीने प्रत्येक शाळात एका वर्गातील 50 टक्के विद्यार्थी दिवसाआड अशाप्रमाणे हजेरीचे नियोजन करण्याचे नियोजन होते. यानुसारच आणि काही शाळांनी एक दिवस नववी व दुसर्या दिवशी दहावी अशाप्रकारे वर्ग भरविण्याचा निर्णय घेत आज शाळा सुरू केली.

शहरातील 13 शाळांतील 2 हजार 318 पैकी 684 पालकांनी पाल्याला शाळेत पाठविण्यासंदर्भातील संमतीपत्र भरुन दिले असुन यातून पालकांत करोनाची भिती असल्याचे आधोरेखित झाली आहे. मात्र पुढच्या काळात ही उपस्थिती वाढत जाईल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला आहे.

47 शिक्षक पॉझिटीव्ह

शासनाच्या निर्देशानुसार 1500 शिक्षक सेवकांच्या चाचण्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या आहे. त्यात 47 जण करोना पॉझिटीव्ह आढळले आहे. यात 21 मुख्याध्यापक, 21 शिक्षक, 1 लिपीक व 4 शिपाई यांचा समावेश असल्याची माहिती मनपा शिक्षण प्रशासनाधिकारी सुनिता धनगर यांनी दिली.