शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न

अ.भा. किसान महासभेचे राष्ट्रीय सचिव कॉ. राजाराम सिंग यांचा आरोप
शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न

मनमाड । प्रतिनिधी Manmad

केंद्र सरकारचे (Central Government) तिन्ही कृषी कायदे (Agricultural laws) शेतकर्‍यांसाठी (Farmers) मारक तर भांडवलदारांसाठी हिताचे असल्यामुळे देशभरातील शेतकरी दिल्लीमध्ये (Delhi) कायदे रद्द व्हावेत (Laws should be repealed) यासाठी आंदोलन (Movement) करत आहे.

साडेनऊ महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर देखील मोदी (Narendra Modi) सरकार या आंदोलनाकडे केवळ दुर्लक्षच करीत नसून आंदोलन चिरडण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असल्याचा आरोप अ.भा. किसान महासभेचे राष्ट्रीय सचिव कॉ. राजाराम सिंग (National Secretary of Kisan Mahasabha Co. Rajaram Singh) यांनी येथे बोलतांना केला.

सत्यशोधक शेतकरी सभा (Satyashodhak Shetkari Sabha) व श्रमिक शेतकरी सभा (Shramik Shetkari Sabha) यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला (Farmers movement) समर्थन देण्यासाठी औरंगाबाद (Aurangabad) ते कोल्हापूर (Kolhapur) या राज्यव्यापी शेतकरी संवाद यात्रेचे मनमाड (Manmad) शहरात आगमन झाले. यावेळी आंदोलनाची भूमिका विषद करण्यासाठी रेल्वे सेवक संघटनेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कॉ. राजाराम सिंग बोलत होते.

आंदोलन चिरडण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी जोपर्यंत कायदे रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करत कॉ. सिंग पुढे म्हणाले, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. आंदोलन सुरू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 650 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला असून आमच्यासाठी ते शहिद आहेत.

केंद्र सरकार देशाची संपत्ती भांडवलदारांना विकत आहे, देशात जातीयवाद, बेरोजगारी (Unemployment) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोदी सरकार शेती पण भांडवलदारांना विकण्याचा घाट घालत असल्याचा आरोप राजरामसिंग यांनी केला. शेतकर्‍यांचे आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी हिंदू-मुस्लिम, शिख, इसाई यांच्यात फूट पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न केंद्र सरकार आणि भाजपा (BJP) करीत असल्याचा आरोप पंजाब किसान यूनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ. सुखदर्शनसिंग नट (National Vice President of Punjab Kisan Union Co. Sukhdarshan Singh Nat) यांनी केला.

आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकर्‍यांना देशद्रोही (Traitor), खलिस्तानवादी (Khalistan) ठरविण्यात येत असल्याचे पाहून देशभरातील जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. शेती वाचवा देश वाचवा यासाठी आम्ही आंदोलन करीत असून 27 सप्टेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. भारत बंदला यशस्वी करण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले.

व्यासपीठावर सत्यशोधक शेतकरी सभेचे संघटन किशोर ढाले, सेक्रेटरी करणसिंग कोकणी, श्रमिक शेतकरी संघटनेचे राजेंद्र बावके, सेक्रेटरी सुभाष काकुस्ते, दिलीप गावित, मन्साराम पवार, सुरेश मोरे, रावजी पथवे आदींसह या राज्यव्यापी संवाद यात्रेत सहभागी झालेले शेतकरी उपस्थित होते. मनमाड येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळ शहर शाखेतर्फे या राज्यव्यापी शेतकरी संवाद यात्रेचे स्वागत व संयोजन केले. यावेळी यशवंत बागूल, आमिन शेख, अर्जुन बागूल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com