भरवस्तीतील बँकेवर दरोड्याचा प्रयत्न
भरवस्तीतील बँकेवर दरोड्याचा प्रयत्न
नाशिक

भरवस्तीतील बँकेवर दरोड्याचा प्रयत्न

संगणक लंपास, रोकड वाचली

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

शहराच्या अत्यंत मध्यवस्तीचा परिसर असलेल्या रविवार कारंजा परिसरातील युको बॅँकेच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश करत सिनेस्टाइल दरोडा टाकण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केल्याचे सोमवारी (दि.10) उघडकीस आले.

चोरट्यांच्या हाती रोकड लागली नसली तरी चोरट्यांनी सीसीटीव्हीचे नुकसान करत बॅँकेतील 2 संगणक व एक लॅपटॉप लंपास केल्याचे समोर आले आहे. रविवार कारंजा येथील यशवंत मंडई भागात नॅशनल युको बँक आहे.

शनिवार व रविवार सुटीची संधी साधत चोरट्यांनी युको बँकेत प्रवेश केला. सोमवारी सकाळी युको बँकेचे शटर सेवकांनी उघडले असता बँकेतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून दिसले. पाठीमागील भिंतीला भगदाडदेखील आढळून आले.

बँकेच्या अधिकार्‍यांनी या घटनेची माहिती पोलिांना देताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस उपायुक्त अमोल तांबे,सहायक आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरिक्षक हेमंत सोमवंशी यांच्यासह श्वान पथक, गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी धागेदोरे शोधले जात आहे.

चोरट्यांनी बँकेत प्रवेश केल्यानंतर सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे नुकसान केल्याचे आढळले. दोन दिवसांपासून बॅँकांना सुटी होती; त्यामुळे हा प्रकार सकाळी उघडकीस आला. चोरट्यांनी हा सगळा लुटीचा प्रकार शनिवारी मध्यरात्री केला की रविवारी याबाबत शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पालिसांनी ताब्यात घेतले असून विविध पथकांद्वारे याचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपआयुक्त अमोल तांबे यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com