जंगलात मुलीला फासावर लटकवण्याचा प्रयत्न

जंगलात मुलीला फासावर लटकवण्याचा प्रयत्न

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

10 ते 12 वर्षीय मुलीस फासावर लटकवून मारण्याच्या प्रयत्न केल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) देहरेवाडी येथील जंगलात घडला. गुराख्याच्या प्रयत्नातून या मुलीचे प्राण वाचले असले तरी या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे...

काल दुपारी 12 वाजेच्या सुमारास देहरेवाडी येथील गुराखी आपले नेहमीप्रमाणे जनावरे चारीत असताना जंगलात काही तरी आवाज व झटापट होत असल्याची जाणीव झाली. त्याने जंगली जनावरे असावे, असा अंदाज करुन त्या दिशेने पाहणी केली असता एक इसम मुलीला फासावर लटकवत असल्याचे दिसून आले.

गुराख्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता दाट झाडे झुडपांचा फायदा घेत तो फरार झाला. गुराख्याने त्या मुलीला तत्काळ खाली उतवून नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

दिंडोरी पोलिसांना (Dindori Police) ही बाब समजताच अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु झाले असून अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड (Amo; Gaikwad) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व दिंडोरी पोलिस करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com