स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडीसाठी प्रयत्न

जि.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांचे प्रतिपादन
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडीसाठी प्रयत्न

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आगामी जिल्हा परिषदZilla Parishad , पंचायत समित्याPanchayat Samitiies, नगरपालिकांसहMunicipalities , नाशिक आणि मालेगाव Nashik & Malegaon Municipal Corporation महानगरपालिका निवडणुकीत Elections महाविकास आघाडीतील पक्षांशी सन्मानपूर्वक आघाडी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल alliance with Mahavikas Aghadi parties , असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ Guardian Minister Chhagan Bhujbal यांनी केले.

भुजबळ फार्म येथील कार्यालयात भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आजी- माजी आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.

यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार माणिकराव कोकाटे,आमदार दिलीपराव बनकर, आमदार नितीन पवार, आमदार सरोज आहिरे, माजी खासदार समीर भुजबळ, मालेगाव शहर जिल्हाध्यक्ष माजी आमदार शेख आसिफ शेख, माजी आमदार सर्वश्री जयवंतराव जाधव,संजय चव्हाण, दीपिका चव्हाण, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पवार, कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे उपस्थित होते.

नाशिक जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच निर्णायक स्थितीत राहिला आहे. त्यामुळे यंदाही नाशिक जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावयाचे आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने पक्षीय स्तरावर सन्मानपूर्वक आघाडी करण्यास आपला प्रयत्न असणार आहे.शहर आणि जिल्हाभरात केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवून पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करण्यात यावे अशा सूचना त्यांनी पदाधिकार्यांना दिल्या.

तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून आपण सर्वांनी कामाला सुरुवात करावी. आपापल्या परिसरात कोविडच्या संदर्भात आवश्यक ती मदत करण्यास प्राधान्य देण्यात यावे अशा सूचना सुध्दा मंत्री छगन भुजबळ यांनी केल्या. सदर बैठकीत नाशिक, मालेगाव महानगरपालिका, जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com