Nashik : मागील भांडणाची कुरापत काढून महिलेचे घर जाळण्याचा प्रयत्न

Nashik : मागील भांडणाची कुरापत काढून महिलेचे घर जाळण्याचा प्रयत्न

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

मागील भांडणाची (quarrel) कुरापत काढून एका व्यक्तीने उपनगर परिसरात (Upnagar Area) असलेल्या समतानगर येथील एका महिलेचे (Woman) घर जाळण्याचा (Burning) प्रयत्न केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे....

याबाबत अधिक माहिती अशी की, सुशीला प्रेम चव्हाण (रा.सोनवणे बाबा चौक, समतानगर उपनगर नाशिकरोड) या महिलेने तक्रार दाखल केली असून याच परिसरात राहणाऱ्या पंकज मोरे याच्याबरोबर सदर महिलेचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते

यावेळी पंकज मोरे याने मागील भांडणाची कुरापत काढून सुशीला चव्हाण यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर त्याने या महिलेचे घर जाळण्याचा प्रयत्न करून घराबाहेर उभी असलेली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच. १५ एचपी ६३७४ काहीतरी ज्वलनशील पदार्थ (Flammable substances) टाकून जाळून टाकली. या घटनेत चव्हाण यांचे सुमारे ५१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, याप्रकरणी सदर महिलेच्या तक्रारीवरून उपनगर पोलिसांनी (Upnagar Police) मोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर (Nilesh Mainkar) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com