सप्तशृंगी गडावर वाहन जाळण्याचा प्रयत्न

- घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
सप्तशृंगी गडावर वाहन जाळण्याचा प्रयत्न

सप्तशृंगी गड | वार्ताहर Saptshrungi Gadh

कळवण तालुक्यातील Kalwan Taluka सप्तशृंगी गड Saptshrungi Gadh येथे दि 2 नोव्हेंबरच्या मध्यरात्री वाहन जाळण्याचा Attempt to burn car प्रकार उघडकीस आला असून कळवण पोलीस ठाण्यात संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की सप्तशृंगी गड येथील मूळ रहिवासी अजय रमाकांत दुबे हे येथे व्यवसाय करतात .मागील दोन वर्षांपूर्वी गडावरील राहणारे महेंद्र उर्फ बंटी कोळपकर कासार (हल्ली रा.त्रिमूर्ती चौक,नाशिक)या इसमाबरोबर किरकोळ कारणावरून भांडण झाले होते.तेव्हा पासून महेंद्रने मनात राग धरून अजय दुबे यांना तुझे मोठे नुकसान करेल अशी धमकी दिली होती.

दि २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १: ४० च्या सुमारास अजय दुबे यांचा डस्टर कंपनीचे वाहन क्र एम ,एच ४१ व्ही ९३७२ जय माँ सप्तशृंगी लॉजिग समोर उभे केलेले होते.त्या ठिकाणी महेंद्र उर्फ बंटी मोटार सायकल वरून आला व त्याच्या सोबत असलेल्या पेट्रोलच्या बाटलीने सदर वाहनावर पेट्रोल त्याने आग लावली.

वाहन जाळण्याचा प्रकार शरद वाजपेयी व महेश वाघ यांच्या निर्देशनास आलेल्या दुबे यांना त्यांनी फोनवरून सांगितले.व आग त्वरित विझवली त्यामुळे मोठी घटना टळली.घटनास्थळी दुबे यांना पेट्रोलची बाटली व दोन माचीस पेट्या तसेच अर्धवट जळालेल्या काळ्या निळ्या रंगाच्या हातमोजा आढळला.त्यारून त्यांना संशय आला की आपले वाहन कोणीतरी पेटविले आहे.

समोरच असलेल्या हॉटेलचे सीसीटीव्ही तपासले असता त्यात सदर व्यक्ती वाहन जाळत असल्याचा प्रकार लक्षात आला.या प्रकारामुळे वाहनांचे अंदाजे ५० हजाराचे नुकसान झाले असल्याचे तक्रारीच्या नमूद केले आहे.तरी कळवण पोलीस ठाण्यात ४३५ गुन्हा नोंद केला आहे ,तसेच पंचनामया पूर्तता बघून गुन्ह्याची वाढ होण्याची शक्यता आहे

सप्तशृंगी गडावर दररोज राज्यातून लाखो भाविक येतात त्यामुळे ट्रस्टकडून १५ लाख खर्च करून सप्तशृंगी गडावर पोलीस चौकी बांधली आहे.परंतु ह्या चौकीवर एकही पोलीस कर्मचारी उपस्थित राहत नाही.यामुळे गडावर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे - अजय दुबे सप्तशृंगीगड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com