<p><strong>नाशिक | Nashik</strong></p><p>आडगाव येथे राहणार्या महिला पोलीसांच्या घरी घराच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून आतमध्ये प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा घटना रविवारी (दि.21) रात्री समोर आली. </p> .<p>याप्रकरणी सुरेखा एकनाथ कुमावत (रा. ज्ञानेश्वर सोसायटी, कोणार्कनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रविवारी (दि.21) रात्री दोनच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी कुमावत यांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी व टॉवर बोल्ट तोडून आतमध्ये प्रवेश करत चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार वाढवणे अधिक तपास करत आहे.</p>