अहंकाराच्या त्यागाने पुण्यप्राप्ती - पं. मिश्रा

अहंकाराच्या त्यागाने पुण्यप्राप्ती - पं. मिश्रा

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

आपणच कुटुंबाचे पालन पोषण करतो माझ्यामुळे सर्वांना सुखाची प्राप्ती होत आहे या अहंकारात (Ego ) कुणी राहू नये ज्याने तुम्हाला मानवी जन्म दिला तो परमात्मा शिवच सर्व काही करत असतो. तुम्ही श्वास घेत आहात ते देखील शिव कृपे मुळेच हे विसरू नका. चीनने खूप प्रगती केली परंतु लोकांचे मृत्यू टाळू शकले नाही मानव देह छोटासा आहे तेव्हा अहंकार मीपणाचा त्याग करीत शिवभक्तिद्वारे जनमानसाच्या कल्याणाचे भाव ठेवत पुण्य पदरात पाडून घ्या असे आवाहन शिव महापुराण व्याख्याते पंडित प्रदीप मिश्रा ( Pandit Pradip Mishra)यांनी येथे बोलताना केले

येथील कॉलेज मैदानावर सुरू असलेल्या श्री पुण्य शिव महापुराण कथा महोत्सवात (Shri Punya Shiv Mahapuran Katha Mahotsav )पाचव्या दिवशी भक्ती द्वारे मिळणाऱ्या पुण्य व ईश्वराच्या प्राप्ती संदर्भात पंडित मिश्रा यांनी उपस्थित भाविकांचे निरूपण केले आज पाचव्या दिवशीही कथा श्रवणासाठी लाखो महिला पुरुष भाविक उपस्थित राहिल्याने कॉलेज मैदान परिसर भाविकांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता

आपल्या जीवनात जेव्हा समस्या संकटे निर्माण होतात तेव्हा शिव महापुराण कथा व श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र जपाची गरज असते आपले दुःख कुणासमोर मांडून रडू नका श्रीराम, श्रीकृष्ण व माता सती आदी देवतांना देखील ते ईश्वर असून सुद्धा स्वतःचे दुःख स्वतःच भोगावे लागले आहे याकडे लक्ष वेधत पंडित मिश्रा पुढे म्हणाले आपली भाग्यरेषा कुणीच बदलू शकत नाही शिवभक्ती व चांगले कर्म वाढवत परिश्रम घेत आपणच आपले भाग्य बदलू शकतो कर्माचे भोग देवांना देखील भोगावे लागले आहे तेव्हा तुमच्या कर्माचे भोग तुम्हालाच भोगावे लागतील हे लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे शिवभक्ती करा, कुणाची निंदा करू नका, मित्र परिवारास धोका देऊ नका चांगले सत्कर्म करत रहा यामुळेच तुमच्या जीवनाचे सार्थक होणार असल्याचे त्यांनी सांगितले

नववर्षाची सुरुवात हॉटेलात नाही तर शिवालयात जाऊन महादेवाची पूजा आराधना करत करा असे आवाहन भाविकांना करत पंडित मिश्रा कुठे म्हणाले मानव देह विचित्र आहे मखमल व डनलच्या गादीवर झोपून गोळ्या खाऊन देखील चांगली झोप येत नाही कारण शिवभक्तीचा व चांगल्या कर्माचा अभाव आहे सुखाची झोप येण्यासाठी भक्ती बरोबर तुम्ही चांगले कर्म देखील केले पाहिजे तुमच्या समस्यांचे निराकरण महादेवावर दृढ विश्वास ठेवल्यामुळे झालेले दिसून येईल लाखो औषधांचे एकमेव औषध श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र जाप आहे जेव्हा संकटांची अनुभूती होईल तेव्हा हा जप करा तुमचे संकट परमात्मा शिव निश्चित दूर करेल असा विश्वास पंडित मिश्रा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला

मुलींनी आपला हात कुणाच्याही हातात देऊ नये , भूलथापांना व क्षणिक आकर्षणांना बळी पडून चुकीच्या माणसाच्या हातात हात दिल्यास तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची भीती असते असे स्पष्ट करत पंडित मिश्रा पुढे म्हणाले चरण व आचरणात अंतर आहे आपले चरण मंदिरापर्यंतच घेऊन जातात तर आचरण भजन भक्ती द्वारे तसेच चांगल्या कर्माद्वारे देवापर्यंत नेत असते, तेव्हा चांगल्या आचरणाद्वारे सत्कर्म करा देवाची भक्ती सोडू नका सनातन धर्मास ठेच पोहोचविणारे मंदिर व घरात अगरबत्ती लावण्यास देखील विरोध करीत आहेत मात्र या गोष्टीकडे लक्ष देऊ नका देवाजवळ अगरबत्ती लावल्याने नकारात्मकता निश्चित दूर होते असे स्पष्ट करत पंडित मिश्रा यांनी पशुपतीनाथ व्रत( Pashupatinath Vrat Puja) केल्यामुळे अनेकांचे प्राणावरील संकट दूर झाल्याची धुळे शिरपूर जळगाव आदी भागातील भाविकांनी पत्राद्वारे दिलेली माहिती वाचून दाखवली,

शिव आराधना केल्याने लोकांचे जीवन सुखमय होत आहे शिवभक्तीच्या शक्ती पुढे देवता देखील हतबल ठरले होते त्यामुळे भाविकांनी देखील भक्तीच्या जोरावर परमात्मा शिवास प्राप्त करत आपले जीवन सार्थकी लावावे असे आव्हान पंडित मिश्रा यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com