पोलिसावर कोयत्याने हल्ला; चार संशयित ताब्यात

पोलिसावर कोयत्याने हल्ला; चार संशयित ताब्यात

घोटी | जाकीर शेख Ghoti

मुंबई- आग्रा महामार्गावरील ( Mumbai-Agra Highway) वाडीव-हे फाट्यावर वाद सुरु असतांना हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार योगेश पाटील यांच्यावर एकाने धारदार कोयत्याने वार ( Attacked on Policeman )केला. या हल्ल्यात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी योगेश पाटील आणि त्यांचे एक सहकारी प्रविण तातळे इगतपुरी कडून नाशिक कड़े जात होते. वाडीव-हे येथील कवटी फाटा पोलीस चौकीच्या मागे हॉटेल ब्रम्हगिरी जवळ त्यांना गर्दी दिसली म्हणुन ते तिथे गेले असता त्यांना त्या ठिकाणी वाद सुरु असल्याचे दिसले. वाद सोडविण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार योगेश पाटील, निवृत्ती तातडे ( पुर्ण नाव, गाव माहित नाही.) गेले असता त्यांना संशयित आरोपी यांनी आमचे वादात का पडले या कारणावरुन कुरापत काढली.

आरोपी सारंग माळी याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील कोयत्याने पोलीस हवालदार योगेश पाटील याचे डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. आरोपी तुषार भागडे याने निवृत्ती तातडे याचे डोक्यात लोखंडी रॉड मारुन गंभीर जखमी केले. आरोपी नागेश भंडारी, पुरुषोत्तम गिरी यांनी जखमी साक्षीदारांना वाईट साईट शिवीगाळ करुन जिवे मारण्याचा दम दिला अशी फिर्याद स्थानिक गुन्हे पोलीस हवालदार प्रविण भाऊराव मासुळे, वय ४३ यांनी दिली आहे. भा. द.वि कलम ३०७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून संशयित आरोपी अटक करण्यात आले आहेत. वाडीवऱ्हे पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

पोलीस कर्मचा-यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच वाडीव-हे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान हल्लेखोर दुचाकीने फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील तत्काळ हजर झाले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोंरांची माहिती मिळवत पोलिसांनी गुरुवारी समृद्धी महमार्गालगत लपुन बसलेल्या सारंग रंगनाथ माळी, वय २३ वर्षे रा. माणिकखांब, तुषार प्रकाश भागडे, वय १९ रा. तळेगाव, इगतपुरी, नागेश हरिश्चंद्र भंडारी ( चिमण्या ) वय १८ वर्षे ०२ महिने रा. नांदगाव सदो, पुरुषोत्तम संजय गिरी ( गंगा ) वय १९ रा. वाडीवऱ्हे या फरार झालेल्या चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com