उत्तम नगरला तरुणावर धारदार शस्त्राने वार

अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उत्तम नगरला तरुणावर धारदार शस्त्राने वार

नवीन नाशिक । प्रतिनिधी

मागील भांडणाची कुरापत काढून तिघांनी एका तरुणाला धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयितांना 24 तासाच्या आत पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन शिंदे, प्रभाकर देशमुख व सागर जगताप हे तिघे एकता चौक, साईबाबा मंदिराजवळ, उत्तम नगर येथे गप्पा मारत उभे होते. त्याच वेळी संशयित सुरेश धनगर ( 30 रा. उत्तम नगर ), शुभम नेरकर ( 21 रा. एकता चौक, उत्तम नगर ) व गौरव आखाडे हे तिघे तेथे आले व मागील भांडणाची कुरापत काढत चेतन शिंदे यास शिवीगाळ करत शुभम नेरकर याने धारदार शस्त्राने शिंदे यांच्या पाठीवर ,मांडीवर ,डाव्या हाताच्या पंजावर व गुडघ्यावर वार वार केले.

याच दरम्यान सुरेश धनगर व गौरव आखाडे यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने शिंदे यांना मारहाण करून तुला गोळ्या घालून ठार मारू अशी धमकी देखील दिली. शिंदे याला परिसरातील नागरिकांनी जखमी अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यास खासगी रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात फरार संशयितांचा शोध घेत सुरेश धनगर व शुभम नेरकर यांना अटक केली असून या प्रकरणी पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास सोनवणे ,पोलीस शिपाई दीपक वाणी करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com