नाशिकरोड परिसरात दोघांवर कोयत्याने हल्ला

क्राइम
क्राइम

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

येथील दुर्गा गार्डनजवळ (Durga Garden) असलेल्या फळ मार्केटमध्ये (Fruit Market) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास तिघे जण फळ बॉक्स (Fruit box) चोरून नेत असताना या ठिकाणी ड्युटी करणारे वाॅचमन व त्याच्या भावाने रोखले असता त्यांच्यावर कोयत्याने हल्ला (Attack) करून जखमी केल्याचा प्रकार घडला आहे...

याबाबत नागेंद्र भरतसिंग दयाळ (Nagendra Bharatsingh Dayal) (रा. श्रमिक हॉल, नाशिकरोड) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात (Nashikroad Police Station) तक्रार दाखल केली असून तक्रारीत म्हटले आहे की, मी व माझा भाऊ राकेश (Rakesh) दुर्गा गार्डनजवळ असलेल्या फळ मार्केटमध्ये ड्युटी करत होतो.

दीड वाजेच्या सुमारास साहिल (Sahil) उर्फ पोशा व गणेश राजेंद्र यादव (Ganesh Rajendra Yadav) तसेच आणखी एक जण याठिकाणी आले.त्यांनी सलीम शेख (Salim Sheikh) यांच्या दुकानातून फळांनी भरलेला बॉक्स बळजबरीने काढून तेथून जात होते.

आपण त्यांना विरोध केला असता मला शिवीगाळ व मारहाण करून कोयत्याने हल्ला करून जखमी केले. तसेच माझा भाऊ राकेश यालाही शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर तिघे जण फरार झाले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com