रेल्वे स्थानकात पोलीस अधिकार्‍यावर हल्ला; हल्लेखोरास अटक

रेल्वे स्थानकात पोलीस अधिकार्‍यावर हल्ला; हल्लेखोरास अटक

नांदगाव । प्रतिनिधी | Nandgaon

येथील रेल्वे स्थानकावर (railway station) संशयास्पद फिरत असल्याने चौकशीसाठी ताब्यात घेत सुरक्षा बलाच्या ठाण्यात नेलेल्या तरूणाने पोलीस निरीक्षकांवर (Inspector of Police) धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याने ते जखमी झाले.

तब्बल चार तास जवळ असलेल्या शस्त्राच्या धाकावर शहर व रेल्वे पोलिसांना (Railway Police) झुंजविणार्‍या हल्लेखोर तरूणाने स्वत:वर वार करत जखमी करून घेतले. आज सकाळी रेल्वे सुरक्षा बल (Railway Security Force) पोलिसांच्या कार्यालयात ही घटना घडली. दरम्यान, हल्लेखोराने पोटावर शस्त्राने वार केल्याने गंभीररित्या जखमी झालेले सुरक्षा बलाचे निरीक्षक धर्मेंद्रकुमार तिवारी (Inspector Dharmendra Kumar Tiwari) यांना प्रथम ग्रामीण रूग्णालयात नंतर मालेगावी खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शहरात खळबळ उडवून देणार्‍या या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास नागपूर-पुणे एक्सप्रेस (Nagpur-Pune Express) रेल्वे स्टेशनवर थांबली असता लोकेश लिलाधर तिडके (रा. नांदलपार, जि. गोंदिया) हा युवक गाडीतून उतरून तो रेल्वे स्थानकावर फिरत होता. सदर तरूण संशयास्पदरित्या फिरत असल्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी ए.के. खान (Railway Security Force employee A.K. Khan) यांनी रेल्वे तिकिटाबाबत त्याच्याकडे चौकशी केली. मात्र तिकिट (ticket) दाखविण्याऐवजी तिडके याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने खान यांनी त्यास चौकशीसाठी सुरक्षा बलाच्या कार्यालयात नेवून आत बसविले.

काही वेळेनंतर सुरक्षा बलाचे निरीक्षक धर्मेंद्रकुमार तिवारी कार्यालयात आले असता लोकेशने कार्यालयाचा दरवाजा आतून बंद करून घेत तिवारी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला (Assault with a sharp weapon) चढविला. त्यांच्या पोटात वार करून तिडके कार्यालयाबाहेर पळाला. नंतर हल्लेखोर तिडके याने शस्त्राचा धाकावर तब्बल चार तास शहर, रेल्वे पोलीस आणि सुरक्षा बलाचे जवानांना झुंजवत ठेवले. त्यानंतर लोकेश स्वतःवर धारधार शस्त्राने वार करून जखमी करून घेतल्याने पोलिसांनी नागरीकांच्या मदतीने त्यास शिताफीने ताब्यात घेतले.

दरम्यान, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक तिवारी यांना सामाजिक कार्यकर्ते तुषार पांडे, गोविंद खैरनार यांनी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. हल्लेखोर लोकेश तिडकेविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होते. घटनास्थळी चाळीसगाव येथील रेल्वे पोलीस निरीक्षक शब्बीर शेख यांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com