नाशकात पोलिसांवर हल्ला; नव्या आयुक्तांपुढे गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचे आव्हान

नाशकात पोलिसांवर हल्ला; नव्या आयुक्तांपुढे गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचे आव्हान

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात (Nashik City) मध्यरात्री डेल्टा मोबाईलवर कॉल (Call on Delta Mobile) आल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवर संशयिताने हल्ला केल्याची घटना घडली....

अधिक माहिती अशी की,काल (दि २४) रोजी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास डेल्टा मोबाईलवर कॉल आला होता. यावेळी पोलीस शिपाई नवनाथ उगले व मदत बेंडकुळे हे घटनास्थळी वडाळा नाका परिसरातील रेणुकानगर परिसरात पोहोचले.

यावेळी, याठिकाणी घडलेली माहिती एमडीटी रजिस्टरवर (MDT Register) नोंद करत असताना संशयित विकास मुकेश लाखे याने रजिस्टर ओढण्याचा प्रयत्न केला. तसेच उगले यांनी प्रतिकार केला असता त्याचा राग आल्याने संशयिताने लाकडी दांडक्याने दोन्ही पोलिसांना मारहाण केली.

तसेच शिवीगाळ करून अंधाराचा फायदा घेत संशयित पसार झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत (Sarkarwada Police Station) सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.