नाशकात चाललंय तरी काय? वृत्तपत्र विक्रेत्याच्या घरावर हल्ला, लाखोंचे नुकसान

नाशकात चाललंय तरी काय? वृत्तपत्र विक्रेत्याच्या घरावर हल्ला, लाखोंचे नुकसान

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

येथील वृत्तपत्र विक्रेते (Newspaper seller) अनिल कुलथे (Anil Kulthe) यांच्या घरावर शुक्रवारी रात्री एका टोळक्याने हल्ला (Attack) केल्याची घटना घडली आहे....

या हल्ल्यात कुलथे यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. त्याचप्रमाणे दुचाकी व चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात येऊन त्यांचे नुकसान करण्यात आले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात (Nashikroad Police) तीन जणांविरुद्ध साध्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

यासंदर्भात अनिल कुलथे यांच्या पत्नी उषा कुलथे (रा. पाटील गॅरेजच्या पाठीमागे देवळाली गाव नाशिकरोड) यांनी यासंदर्भात नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashikroad Police Station) तक्रार दाखल केली आहे.

कुलथे कुटुंबीय शुक्रवारी रात्री घरात असताना याच परिसरात राहणारे योगेश आव्हाड, प्रिन्स लांबा, किरण शिंदे व त्यांच्या सात ते आठ साथीदारांनी मागील भांडणाची कुरापत काढून कुलथे यांच्या घरावर तुफान दगडफेक (Stone Pelting) केली.

या दगडफेकीत घराच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. घराबाहेर पार्क करण्यात आलेली कुलथे यांची चार चाकी क्रमांक एम. एच. 15 एच. 7936 या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या.

नाशकात चाललंय तरी काय? वृत्तपत्र विक्रेत्याच्या घरावर हल्ला, लाखोंचे नुकसान
होणार, सगळ्यांचा कार्यक्रम होणार...; काय म्हणताय 'समरेणू'चे कलाकार?, पाहा व्हिडीओ

तसेच दुचाकी स्प्लेंडर गाडी क्रमांक एम. एच. 15 ए. डी. 8684 या गाडीची ही तोडफोड करण्यात आली. यानंतर हल्लेखोरांनी कुलथे कुटुंबीयांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर हल्लेखोर फरार झाले.

दरम्यान या घटनेनंतर कुलथे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात (Nashikroad Police Station) तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता घरावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश न्यायदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com