मनपा अधिकार्‍यांवर जीवघेणा हल्ला; म्युन्सिपल कामगार सेनेकडून निषेध

मनपा अधिकार्‍यांवर जीवघेणा हल्ला; म्युन्सिपल कामगार सेनेकडून निषेध

येवला | प्रतिनिधी | Yeola

ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा येथील येवला म्युन्सिपल कर्मचार कामगार सेनेने (Yeola Municipal Employees) निषेध (Agitation) करीत घोषणाबाजी करण्यात आली. हल्ला करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रमोद हिले (Pramod Hile) यांना देण्यात आले....

ठाणे येथील माजिवाडा प्रभाग येथे अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असतांना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे हातगाडी फेरीवाले व अमरजित यादव यांनी त्यांच्यावर व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हात्याराने जीवघेणा हल्ला करून या दोघांनाही गंभीर दुखापत केली आहे.

याबाबत येवला म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेकडून तिव्र निषेध करण्यात आला व तहसीलदार व नगरपरिषद येथे कडक कारवाई करण्यात यावी, या विषयीचे निवेदन देण्यात आले.

या जिवघेण्या हल्ल्यात सहाय्यक आयुक्त पिंगळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे पूर्णपणे तुटून उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या डोक्या गंभीर मार लागला आहे. अंगरक्षक सोमनाथ पालवे (Somnath Palve) यांच्या डाव्या हाताचे एकबोट पूर्णपणे तुटून पडले आहे.

झालेला प्रकार तिशय गंभीर असून एका महिला अधिकार्‍यावर अशा प्रकारचा हल्ला होणे अत्यंत चिंताजनक बाब आहे. या बाबीचे सर्व स्तरावरून निषेध होणे आवश्यक आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे संघटनेच्या वतीने या कृत्याचा जाहीर निषेध करत घोषणाबाजी केली.

अटक केलेल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न व्हावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर अध्यक्ष शाम लोंढे, सरचिटणीस तुषार लोणारी, खजिनदार विजय झाल्टे, उपाध्यक्ष केशव विवाल, संघटक धनराज ढिकले, रुपेश तेजी आदींच्या सह्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com