
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad
जेलरोड परिसरात असलेल्या वसंत कॉलनी (Vasant Colony) येथे तीन जणांच्या अज्ञात टोळक्याने गॅरेज मालकावर हल्ला केला होता यात गॅरेज मालकावर गंभीर जखमी झाले होते. नाशिकरोड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेच्या आधारे एकाचा शोध घेऊन संशयतास अटक केली असून इतर दोघे फरार आहेत...
जेलरोड येथील वसंत विहार कॉलनी मध्ये असलेल्या गॅरेजमध्ये योगेश मुळे हे पायऱ्यांवर बसले असताना तीन जणांच्या अज्ञात टोळक्याने त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर संशयित फरार झाले होते.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज शोधला असता फुटेजच्या आधारे शोध लागला असून त्यातील सचिन चौधरी नावाच्या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. दोघेजण मात्र अद्यापही फरार आहेत. याबाबत पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरील पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश न्यायदे, उपनिरीक्षक गणपत काकड हे करत आहे.