दारू पिण्यास नकार दिल्याने व्यापार्‍यावर हल्ला

दारू पिण्यास नकार दिल्याने व्यापार्‍यावर हल्ला

ना.रोड । Nashik Road

जेलरोड परिसरातील बीएमएस मार्केट जवळील सार्वजनिक ठिकाणी पाच दारुड्यांना दारू पिण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या दारुड्यांनी एका...

व्यापार्‍यांसह त्याच्या दोन नोकरावर हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचे वृत्त असे की, किसन बघतराम साधवानी रा. साधवानी भवन, शाहू पथ, नाशिकरोड हे रविवारी (दि. 18) सायंकाळी नऊ वाजेच्या सुमारास आपल्या मालकीचे बीएमएस मार्केट बंद करून बाहेर आले व त्यांनी मार्केटच्या पाठीमागे असलेल्या ठिकाणी फेरफटका मारला असता त्याठिकाणी गायधनी गिरणीवाला व त्याचे पाच साथीदार दारू पीत होते.

या दरम्यान साधवानी यांनी आपल्या खिशातून मोबाईल काढून बोलत असताना त्यातील एक जण आला तुम्ही कोणाला फोन करता, असे म्हणून वाद घालून शिवीगाळ केली. दुसर्‍याने जवळच असलेल्या सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने साधवानी यांच्यावर हल्ला केला. यावेळी साधवानी यांच्या दुकानातील नोकर आकाश नेपाल सिंग व सनी मेहंदीवाल बाहेर आले.

ते हा प्रकार सोडवीत असताना त्यांनाही या दारुड्यांनी मारहाण करून जखमी केले. त्यानंतर या दारुड्यांनी तुम्ही जर पोलिसांत तक्रार केली तर तुमचा मॉल जाळून टाकू, अशी धमकी देऊन सर्वजण दुचाकीवर फरार झाले. दरम्यान या घटनेनंतर साधवानी व दोन नोकरांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी किसन साधवानी यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश न्यायदे, हवालदार संजय चौधरी करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com