बँक सेवकांच्या संपात ग्राहकांना एटीएमचा आधार

बँक सेवकांच्या संपात ग्राहकांना एटीएमचा आधार

सातपूर । प्रतिनिधी Nashik

बँकांच्या विलिनीकरणाविरोधात बँक संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपामुळे two-day strike called by the bank employees unions शहरातील विविध बँकाच्या खातेदारांना एटीएमचाच ATM आधार होता.

मात्र अनेक बँकांचे एटीएम रिकामे झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना फटका बसला. या संपात जिल्हाभरातील तीन हजार सेवक सहभागी झाले होते. या संपामुळे सुमारे दीड हजार कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याचे बोलले जाते.

सर्व सामान्य लोकांचे बहुतांश काते हे राष्ट्रीयकृत बँकामध्ये आहेत. बँक सेवकांचाच संप असल्याने नागरिकांनी आपले व्यवहार एटीएम कार्डच्या माध्यमातून चालवले. अनेक ठिकाणी रोख रकमेला पर्याय म्हणून डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर करताना लोक दिसून येत होते.

मात्र बर्‍याच वेळा खरेदी न करता केवळ रोख रकमेची गरज असल्याने शहरात काही दुकानांतून क्रेडिट कार्ड स्वॅप करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. मात्र त्यासाठी बिलाच्या दीड टक्के रक्कम वसूल करण्याचा नवा फंडा काही लोकांनी चालवला होता.

यातून बँंक ग्राहकांची लूट सर्रास सुरू असल्याचे लक्षात येऊनही ग्राहकांना मजबूरीत हा व्यवहार करावा लागत असलयाची चर्चा आहे. या प्रणालीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे गरजवंत नागरिकांनी मुकाट्याने भुर्दंड सोसल्याचे दिसून आले.

Related Stories

No stories found.